भटक्या कुत्र्यांचा डोंबिवलीकरांना नवा ताप

डोंबिवलीच्या एका सरकारी रुग्णालयात गेल्या सहा वर्षांत श्वानदंशाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. डोंबिवलीत गल्लोगल्ली आढळणाऱ्या उघडय़ावरील कचऱ्यामुळे रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांना होणाऱ्या श्वानदंशात वाढ झाल्याचे डोंबिवलीतील प्राणीसंस्थेचे निरीक्षण आहे. चालू वर्षांत आतापर्यंत तब्बल १८ हजार ८४३ डोंबिवलीकरांना श्वानदंश झाल्याची  नोंद ‘वेटरनरी प्रॅक्टिश्नर वेलफेअर असोसिएशन’ संस्थेने केली आहे, तर गेल्या महिनाभरात ३५०० जणांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समोर आले आहे.

1195 minor girls missing from Nagpur in three years
नागपूर : उपराजधानीतून तीन वर्षांत ११९५ अल्पवयीन मुली बेपत्ता
Mumbai, Two arrested,
मुंबई : वृद्धाचे सोने लुटणाऱ्या दोघांना अटक
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस

२८ सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिवस म्हणून ओळखला जातो. रेबीजमुळे मृत्यू होणाऱ्या घटनांमध्ये आशिया खंडात भारताचा पहिला क्रमांक असून जागतिक स्तरावर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. देशात वर्षांला ३५ हजार नागरिक रेबीजमुळे मृत्युमुखी पडत असल्याचे वेटरनरी प्रॅक्टिश्नर वेलफेअर असोसिएशन संस्थेचे निरीक्षण आहे. डोंबिवली शहरात ठिकठिकाणी उघडय़ावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे वेळोवेळी निर्मूलन केले जात नसल्याने भटक्या श्वानांच्या संख्येत वाढ होत असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.

डोंबिवलीत गेल्या पाच वर्षांत श्वानदंशाचे प्रकार वाढत असल्याचे संस्थेच्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने श्वानदंशाच्या घटना वाढत आहेत. रस्त्यावरील कचऱ्यात श्वानांना खाद्य त्यांना सहजरीत्या उपलब्ध होत असते. यासाठी रस्त्यावरील कचऱ्याची विल्हेवाट योग्यरीत्या लावल्यास श्वानांची संख्या कमी होण्यास मदत होऊन श्वानदंशाच्या घटना कमी होतील, असे ‘वेटरनरी प्रॅक्टिश्नर वेलफेअर असोसिएशन’चे अध्यक्ष डॉ. मनोहर अकोले यांनी सांगितले.