रायगड दर्शन
छत्रपती शिवरायांची राजधानी रायगडाच्या अभ्यास सहलीचे ‘ओरायझन’तर्फे आयोजन करण्यात आले आहे. २८ ते २९डिसेंबर दरम्यान आयोजित या सहलीत १० ते १५ वयोगटातील मुले सहभागी होऊ शकतील. या सहलीत अभ्यासकांच्या नजरेतून रायगडाच्या इतिहासाचे, तिथल्या स्थापत्याचे दर्शन घडवले जाणार आहे. अधिक माहितीसाठी सुहास कोकणे (९८२०६१८७०१) यांच्याशी संपर्क साधावा.
मध्य प्रदेशात भटकंती
‘कल्पविहार अ‍ॅडव्हेंचर्स’ या गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने २४ ते २६ जानेवारी २०१४ या काळात मध्य प्रदेशातील उज्जन, इंदूर, मांडू, ओंकारेश्वर मामलेश्वर येथे अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले आह़े  यात येथील ऐतिहासिक ठिकाणांची जाणकारांकडून माहिती देण्यात येणार आह़े  अधिक माहिती आणि नोंदणीसाठी ९८२०६८४७२३ या क्रमांकावर संपर्क करा.
लोणार सरोवर सफर
उन्नयन संस्थेतर्फे येत्या २५, २६ जानेवारी रोजी जगप्रसिद्ध लोणार सरोवरची सफर आयोजित केली आहे. लोणारचे सरोवर उल्कापातामुळे तयार झालेले आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे हे सरोवर आहे. अधिक माहितीसाठी वैभव प्रभूदेसाई (९९६७५३४३९६, ९७७३५१०५१३)  यांच्याशी संपर्क साधावा.
ताडोबा जंगल सफारी
‘निसर्ग टूर्स’तर्फे येत्या १८ ते २२ मार्च दरम्यान ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीचे आयोजन केले आहे. ताडोबा हा देशातील एक महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. ६२३ चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या या जंगलाचा राजा वाघ आहे. इथे वाघांशिवाय बिबटय़ा, गवे, सांबर, चितळ, वानर, भेकर, मगरींसह अन्य प्राणीही दिसतात. अनेक पशुपक्ष्यांचा मुक्त वावर आहे. नवरंग, स्वर्गीय नर्तकसारखे दुर्मिळ पक्षी या जंगलात दिसतात. या जंगलात बांबू, मोह, अर्जुन, तेंदू, बेहडा, जांभूळ आदी दुर्मिळ वनस्पतीही आहेत. ४५ प्रकारचे सस्तन प्राणी, २८० प्रकारचे पक्षी, ९४ प्रकारची फुलपाखरे, २६ प्रकारचे कोळी आणि ३० सरपटणारे प्राणी अशी ही या जंगलाची संपत्ती आहे. अशा या ताडोबा जंगल सफरीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘निसर्ग सोबती’तर्फेही येत्या २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघांबरोबरच बिबटय़ा, गवे, सांबर, चितळ, वानर, भेकर, मगरींसह अन्य प्राणीही दिसतात. नवरंग, स्वर्गीय नर्तकसारखे अनेक दुर्मिळ पक्षी या जंगलात दिसतात. अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७) यांच्याशी संपर्क साधावा.
अरुणाचल प्रदेशमधील जंगल सफारी
निसर्ग सोबती तर्फे १६ ते २३ फेब्रुवारी दरम्यान अरुणाचल प्रदेश मधील नामदफा नॅशनल पार्क येथे जंगल सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात हिम बिबळ्या, ब्लॅक बिअर, रेड पांडा आदी प्राणी तसेच ४२५ हून अधिक प्रकारचे पक्षी दिसतात. अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७.) यांच्याशी संपर्क साधावा.
रतनगड पदभ्रमण
‘डोंगरी-अ‍ॅन ऑर्गनायझेशन फॉर अ‍ॅडव्हेंचर’ संस्थेच्या वतीने २८ आणि २९ डिसेंबर रोजी रतनगड येथे पदभ्रमणाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी सागर शेंडे (९९२०८५००६) यांच्याशी संपर्क साधावा.  
रणथंबोर टायगर सफारी
राजस्थानमधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. या जंगलाची व्याप्ती ३९२ चौरस किलोमीटर असून या क्षेत्रात २५ वाघ, ४० बिबटे, चिंकारा, अस्वल, चितळ, सांबर, निलगाय, काकर आदी वन्यप्राणी दिसतात. तसेच २६४ प्रकारचे पक्षीही इथे पाहण्यास मिळतात. या जंगलातच इसवीसन ९४४ साली बांधलेला रणथंबोर ऐतिहासिक किल्लाही आहे. हे जंगल आणि किल्ला तसेच या सहलीला जोडून जयपूर शहर सहलीचे निसर्ग टूर्सच्या वतीने आयोजन केले आहे. ९ ते १५ मार्च दरम्यान या निसर्ग सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.
अलंग, कुलंग, मदनगडाची चढाई    
पनवेल येथील निसर्गमित्र संस्थेतर्फे येत्या २६ ते २९ डिसेंबर दरम्यान सर्वोच्च शिखर कळसूबाई, अलंग, कुलंग आणि मदन गटकोटांची पदभ्रमण मोहीम आयोजित केली आहे. हे तीनही दुर्ग सह्य़ाद्रीचे रोद्र रूप धारण केलेले आहेत. यांच्या वाटा भटक्यांना नित्य आव्हान देणाऱ्या असतात. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी धनंजय मदन (९९८७२९०७५९) यांच्याशी संपर्क साधावा.
‘डय़ूक्स नोज’वर रॅपलिंग
‘हाय टेक अ‍ॅडव्हेंचर’  तर्फे  रविवारी २५ डिसेंबर रोजी ‘डय़ूक्स नोज’ कडय़ावर रॅपलिंगचे आयोजन केले आहे. अधिक  माहितीसाठी इच्छुकांनी तुषार मोडक  (९६१९१४४८४७, ९८९२२२५६१५) यांच्याशी संपर्क साधावा.