ईशान्य भारतातील जंगल भ्रमंती
‘निसर्गसोबती’तर्फे अरुणाचल प्रदेशातील ईगल नेस्ट वाइल्ड लाइफ सँच्युरी आणि आसाममधील ‘नामेरी टायगर रिझव्‍‌र्ह’ येथे १६ ते २३ मार्च २०१३ या कालावधीत जंगल सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलामध्ये व्हाइट विंग वूड डक, सिल्व्हर ब्रेसटेड  ब्रोडिबल, क्रो बिल्ड ड्रोंगो, आयबीस बिल, ग्रेट हॉर्नबिल, ओरियनटल हॉबी इत्यादी पक्षी नामेरी येथे तसेच बुगुन लिओसिचला, वॉर्ड्स ट्रोगोन, कुटिया, रस्टी फ्रनटेड बारविंग, नटहँच, रुफस नेक्ड हॉर्नबिल, रेन बाब्लर, लाफिंग थ्रश, फायर टेल मिझोर्नीस अशा अनेक वैशिष्टय़पूर्ण पक्ष्यांचे दर्शन घडते. येथे ४५०हून अधिक प्रकारचे पक्षी, १६५हून अधिक प्रकारची फुलपाखरे, २४ प्रकारचे साप, ७ प्रकारचे सरपटणारे प्राणी, आणि १५ हून अधिक प्रकारचे प्राणी, ज्यात केप्ड लंगुर, बेंगाल टायगर, आशियाई हत्ती, रेड पांडा यांचा समावेश आहे. या भ्रमंतीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी (९९३०५६१६६७) यांच्याशी संपर्क करावा.
कच्छची भटकंती
कच्छचे धाकटे रण, रामसार क्षेत्र हे पक्षीनिरीक्षकांची पंढरी समजली जाते. हिवाळ्यात येथील पाणथळीमध्ये क्रौंच, रोहीत, झोळीवाला, करकोचा, शराटी, चमचा बदक आदी विविध प्रजातींच्या पक्ष्यांचे दर्शन घडते. या भागात खोकड, कोल्हा, रानमांजर, नीलगाय, चिंकारा, काळवीट आदी प्राण्यांचेही दर्शन घडते. अशा या कच्छच्या भटकंतीचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने १३ ते १६ जानेवारी २०१३ दरम्यान आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी ुल्लँ२.स्र्१ॠ१ंेी२@ॠें्र’.ूे या संकेतस्थळावर किंवा हॉर्नबिल हाउस (०२२-२२८२१८११/ २२८७१२०२) इथे संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trek diary
First published on: 26-12-2012 at 01:00 IST