ताडोबाबरोबरच नागझीरा हे देखील महाराष्ट्रातील वाघांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. आर्द-पानगळीच्या या जंगलात बांबू, ऐन, मोह, कांडेळ, धावडा, काटेसावर आदी प्रमुख वृक्ष आहेत. वाघांबरोबरच बिबटय़ा, सांबर, चितळ, वानर, अस्वल, गवा, रानडुक्कर, नीलगाय आदी प्रमुख प्राणी इथे आढळतात. याशिवाय २०० हून अधिक प्रजातींच्या पक्ष्यांचे इथे दर्शन घडते. अशा या जंगलाच्या अभ्यास सहलीचे ‘निसर्ग टूर्स’ तर्फे ३ ते ७ डिसेंबर या कालावधीत आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगर किल्ला सहल
‘निसर्ग दर्शन’ तर्फे येत्या २४ सप्टेंबर रोजी नगर शहरातील भुईकोट किल्ला, चांदबिबीचा महाल, रणगाडा संग्रहालय आदी स्थळांच्या सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.

दांडेली सफारी
‘वसुंधरा आऊटडोअर्स’तर्फे येत्या १५ ते १८ नोव्हेंबर दरम्यान कर्नाटकातील दांडेली येथे जंगल भ्रमंतीचे आयोजन केले आहे. हे जंगल धनेश सारखे पक्षी आणि ब्लॅक पँथर सारख्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९७०१८०३१३) यांच्याशी संपर्क साधावा.

कास पठार अभ्यास सहल
कास पठार हे विविध प्रकारच्या रानफुलांसाठी प्रसिद्ध आहे. हजारो रानफुलांच्या या रंगसोहळय़ात हे पठार बुडून जाते. कवल्या, तेरडा, पंद, कचोरा, फुलकाडी, नीलिमा अशी ही नाना फुले आणि त्यांचे अद्भुत रंग! कास पठाराची हीच निसर्ग नवलाई तज्ज्ञांच्या बरोबर अनुभवण्यासाठी ‘हिरवाई’तर्फे येत्या २३ आणि २४ सप्टेंबर रोजी या पठारावर अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. या बरोबर ठोसेघर धबधबा आणि चाळकेवाडीला भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९६१९७५२१११ किंवा ९६१९२४२८९७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कास पठार पदभ्रमण
‘एसपीआर’तर्फे येत्या २७ सप्टेंबर रोजी कास पठार, ठोसेघर धबधबा अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.

मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trek diary
First published on: 17-09-2015 at 07:38 IST