दिग्विजय हॉर्स रायडिंग अॅकॅडमीतर्फे नुकतेच संस्थेच्या पुण्यातील शिवसृष्टीच्या आवारात अश्वारोहण स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धामध्ये ६ ते ४७ वयोगटातील अनेकांनी भाग घेतला. जिमखाना इव्हेंट, शो-जंपिंग, म्युझिकल चेअर, बेअर बॅक रेस, बॉल बॅकेट ग्रुप, ब्लाइंड सॅडल फिटिंग आदी विविध गटांत या स्पर्धा झाल्या. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि लेफ्टनंट जनरल वाय. डी. सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या संस्थेत अश्वारोहण प्रशिक्षण दिले जाते. पुण्यातील आंबेगाव येथे उभारल्या जात असलेल्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पामध्ये हे प्रशिक्षण दिले जाते. संस्थेतर्फे विविध गडांवर अश्वारोहण स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. आजवर शिवनेरी ते रायगड, विविध जलदुर्ग आदी मोहिमा संस्थेतर्फे काढण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी गुणेश पुरंदरे (९८२२६२१०१६) यांच्याशी संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुंबळे ते शिवथरघळ पदभ्रमण
नॅशनल एज्युकेशन फाउंडेशन (एनइएफ) तर्फे येत्या ८ व ९ जून रोजी कुंबळे ते शिवथरघळ रात्रीच्या पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी अक्षय जाधव (९५४५९१००२८), करण राजेशिर्के (८७९३३७९६२६) यांच्याशी संपर्क साधावा.
जंगली जयगड पदभ्रमण
‘ट्रेकडी’ तर्फे येत्या ८ व ९ जून रोजी जंगली जयगड पदभ्रमणाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी पिनाकिन कर्वे (९४२३२१३१५३) यांच्याशी संपर्क साधावा.

लेह-लडाख सफर
‘मिडअर्थ’ संस्थेतर्फे येत्या २० जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान लेह-लडाख सफारीचे आयोजन केले आहे. ‘शीत वाळवंट’म्हणून प्रसिद्ध असलेले लडाख निसर्गसौंदर्याने संपन्न आहे. बर्फाळ पर्वतरांगा, निळेशार तलाव, आगळे वन्यजीवन, सर्वात उंचीवरचे रस्ते, खारदुंगला सारख्या उत्तुंग खिंडी,
बौद्ध धर्मस्थळे, राजवाडे आदी अनेक आकर्षणे या
सफारीमध्ये दडलेली आहेत. छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी लडाख एक मेजवानी आहे. तरी इच्छुकांनी अधिक माहिती व नोंदणीसाठी विशाल शेटे (९८२०२८४३९१) यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Trek diary digvijay horse riding
First published on: 05-06-2013 at 09:04 IST