हैदराबाद येथे राहाणा-या ११ वर्षांच्या अगस्त जयस्वालने चक्क बारावीची परीक्षा देऊन अनेकांचा आश्चर्याचा धक्का दिला आहे. एवढ्या छोट्या वयात बरावीची परीक्षा देणारा अगस्त हा युसूफगुडा इथल्या सेंट मेरी ज्यूनिअर कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्याने कला शाखेतून बारावीची परीक्षा दिली आहे.

वाचा : परीक्षांच्या सीझनमध्ये कोणता आहार घ्याल?

वाचा : …कशी मिळवाल चांगली झोप!

आता अगस्तचा निकाल येईल तो येईल पण एवढ्या कमी वयात बारावीची परिक्षा देणे म्हणजे नक्कीच कौतुकाची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या सोबत इतक्या कमी वयाच्या मुलाला परिक्षा देताना पाहून इतर विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटले नसेल तर नवलच. आंतरराष्ट्रीय स्तरावरची टेबल टेनिस खेळाडू नयना जयस्वाल हिचा अगस्त लहान भाऊ आहे. नयनाने आपल्या भावाचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. आपल्या कुटुंबातला कमी वयात आपल्यापेक्षा जास्त इयत्तेच्या परिक्षा देणारा अगस्त पहिला नाही. त्याच्या बहिणीनेही पीएचडीसाठी अर्ज केला होता. कमी वयात पीएचडीसाठी अर्ज करणारी ती पहिली खेळाडू होती. काही हिंदी वेबसाईटच्या माहितीनुसार नयनाने १५ व्या वर्षीच पदवी संपादन केली होती.

व्हिडिओ: …आणि सेरेना विल्यम्सने त्या दोघांची व्यवस्थित खेचली!