News Flash

ऐकलं का? १५ वर्षांच्या मुलाने केले ७३ वर्षांच्या वृद्धेशी लग्न

प्रेम खरेच आंधळे असते का?

प्रेमविवाह मग तो आंतरजातीय, आंतरधर्मिय असो, अगदी मुलगी मुलापेक्षा वयाने मोठी किंवा उंचीनेही मोठी असल्याचे आपण ऐकतो. पण एक अतिशय आश्चर्यकारक घटना घडली आहे. ती म्हणजे एका १५ वर्षांच्या मुलाने आपल्या वयाहून चौपट वयाच्या असलेल्या महिलेशी प्रेमविवाह केला आहे. या महिलेचे वय आहे ७३ वर्षे. आता त्याने असे का केले असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण प्रेम आंधळे असते म्हणतात ना ते हेच.

Viral Video : फेसबुक लाईव्हच्या नादात झाला अपघात, तरुणीने गमावला जीव

इंडोनेशियामध्ये ही घटना घडली असून मुलगा अल्पवयीन असल्याने त्यांच्या लग्नाला परवानगी दिली जात नव्हती. मात्र आम्हाला परवानगी न दिल्यास आम्ही आत्महत्या करु अशी धमकी त्या दोघांनी दिल्यानंतर त्यांच्या लग्नाला हिरवा कंदिल मिळाला. हा मुलगा आणि लग्न झालेली महिला एकमेकांचे शेजारी आहेत. सेलामत रियादीला असे या मुलाचे नाव असून त्याला मलेरिया झाला होता तेव्हा त्याच्या शेजारी राहणाऱ्या रोहाया बिनती मोहम्मद जकफर या महिलेने त्याची काळजी घेतली. या दरम्यानच त्यांचे प्रेम फुलले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

९ वर्षांच्या भारतीय मुलीचे भाषण ऐकण्यासाठी जगभरातील वैज्ञानिकांमध्ये उत्सुकता

हा मुलगा लहान असल्याने त्यांनी आता शारीरिक संबंध ठेऊ नयेत असे त्यांना प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. इंडोनेशियामध्ये मुलासाठी वयोमर्यादा १९ आहे. मात्र या दोघांनीही आत्महत्या कऱण्याची धमकी दिल्याने त्यांना परवानगी दिल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. रोहायाची यापूर्वी दोन लग्न झाली असून तिला एक मुलगाही आहे. तर सेलामतला वडिल नसून त्याच्याही आईने दुसरे लग्न केले असल्याने ती त्याच्याकडे लक्ष देत नसल्याचे त्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 9:30 am

Web Title: 15 years old boy got married to 73 years old women in indonesia
Next Stories
1 मोदींसाठी कायपण! मोदीभक्ताने या कारणासाठी मोडले लग्न
2 राजनाथ सिंहच्या ट्विटवर भडकले लोक, त्यापेक्षा मुस्लिम धर्म स्विकारू
3 विमान लँड होण्याआधीच माथेफिरु प्रवाशाने उघडले दार
Just Now!
X