News Flash

अजिंक्यने शेअर केला मुलीचा गोंडस फोटो, जाणून घ्या काय ठेवलं नाव

चाहत्यांकडून अजिंक्यवर कौतुकाचा वर्षाव

भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे काही दिवसांपूर्वीच एका लहान मुलीचा बाप बनला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका आटोपल्यानंतर अजिंक्यने आपली पत्नी राधिका आणि मुलीसोबत दिवाळी साजरी केली. यादरम्यान अजिंक्यने आपल्या मुलीसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अखेरीस अजिंक्यने आपल्या मुलीचं नाव ठेवलं आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या मुलीचा गोंडस फोटो पोस्ट करत अजिंक्यने आपल्या सर्व चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

View this post on Instagram

Aarya Ajinkya Rahane

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

अजिंक्य आणि त्याची पत्नी राधिकाने आपल्या मुलीचं नाव आर्या असं ठेवलं आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनीही अजिंक्यच्या मुलीचं कौतुक केलंय. दरम्यान अजिंक्य सध्या आगामी बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेसाठी तयारी करतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 1:42 pm

Web Title: ajinkya rahane shares first picture of his newborn daughter reveals name psd 91
Next Stories
1 ‘ड्रायर’मध्ये टाकून गर्भवती मांजरीची निर्घृण हत्या, कोर्टाने सुनावली जबर शिक्षा
2 Video: हॉटेलमधील जोडप्यांचे सेक्स करतानाचे आवाज ऐकण्यासाठी तो करायचा ‘हे’ कृत्य
3 Seltos चा ‘जलवा’, Kia Motors ची टॉप 10 मध्ये एंट्री
Just Now!
X