21 September 2018

News Flash

स्टीफन हॉकिंग, आइनस्टाइन आणि गॅलिलिओ यांचा अद्भुत योगायोग

स्टीफन यांना शाळेत 'आइनस्टाइन' म्हणून ओळखले जायचे

स्टीफन यांचा मृत्यू १४ मार्चला झाला, तर आइनस्टाइन यांचा १४ मार्च हा जन्मदिवस आहे.

ख्यातनाम विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. त्यांचा जन्म मृत्यू बद्दल काही योगायोग आहेत ज्यांची सांगड नेहमीच अल्बर्ट आइनस्टाइन आणि गॅलिलिओ गॅलिली यांच्याशी घातली जाते.

HOT DEALS
  • Micromax Dual 4 E4816 Grey
    ₹ 11978 MRP ₹ 19999 -40%
    ₹1198 Cashback
  • Panasonic Eluga A3 Pro 32 GB (Grey)
    ₹ 9799 MRP ₹ 12990 -25%
    ₹490 Cashback

स्टीफन यांचा शाळेत असताना ‘आइनस्टाइन’ या टोपन नावानं ओळखले जायचे. स्टीफन हे शाळेतल्या एका सामान्य विद्यार्थ्यांइतकेच होते त्यामुळे शाळेत त्यांना सरासरीपेक्षा जास्त गुण कधीही मिळाले नाही असं म्हटलं जातं. पण असं असलं तरी त्यांची बुद्धी ही असामान्य असल्याचं त्यांच्या शिक्षकांनीदेखील मान्य केलं होतं. स्टीफन यांचा मृत्यू १४ मार्चला झाला, तर आइनस्टाइन यांचा १४ मार्च हा जन्मदिवस आहे. इतकंच नाही तर दोघांचा बुद्ध्यांकदेखील समान होता. या दोघांचा बुद्ध्यांक १६० एवढा होता त्यामुळे या दोघांच्या जन्माबद्दल हे योगायोग होते.

The Theory of Everything : गोष्ट स्टीफन आणि जेन हॉकिंगच्या प्रेमाची

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी

त्याचप्रमाणे गॅलिलिओ यांची ३०० वी पुण्यतिथी १९४२ साली साजरी करण्यात आली त्याच काळात स्टीफन यांचा जन्म झाला होता. त्यामुळे स्टीफन यांचा जन्म मृत्यू अनेकदा आइनस्टाइन आणि गॅलिलिओशी जोडला जातो. त्याचप्रमाणे हॉकिंग यांना आधुनिक काळातील न्यूटन असेही म्हटले जायचे. वयाच्या ३५ व्या वर्षी हॉकिंग केंब्रिज विद्यापीठात ल्यूकॅशियन प्रोफेसर झाले. केंब्रिज विद्यापीठात हे पद महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेच मानले जाते. न्यूटन देखील ल्यूकॅशियन प्रोफेसरच होते.

First Published on March 14, 2018 1:28 pm

Web Title: albert einstein was born on march 14 hawking died on march 14