सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. गोष्ट चूक असो की बरोबर, बातमी खरी असो किंवा खोटी तिची शहानिशा न करता ती फॉरवर्ड केली जाते. असाच एक मौलवी आणि साधूचा फोटो तुफान वेगानं व्हायरल होत आहे. साधूनां मद्याचा ग्लास भरून देताना मौलवीचा हा फोटो आहे. हा फोटो पाहून अनेकांनी या दोघांवर सडकून टीका केली. चीड आणणारा हा फोटो पाहून काहींनी या दोघांना मनोमन शिव्याही घातल्या. हा फोटो शेअर करणाऱ्या लोकांमध्ये एक लेखिकादेखील होती.

मेहंदीसाठी ‘या’ नववधूनं चक्क ऐश्वर्यासारखा गाऊन तयार करून घेतला

बाहुल्यासारखं दिसण्यासाठी त्यानं केले कोट्यवधी खर्च

लाखों लोकांनी हा फोटो व्हायरल केला. पण, एकालाही हा फोटो एडिट केला असल्याची साधी शंकाही आली नाही. या फोटोचं सत्य ज्यावेळी इतरांना कळलं त्यावेळी सगळ्यांना आपली चूक लक्षात आली. या फोटोत साधू आणि मौलवी मद्यपान करत नसून ते पाणी पित आहे. मौलवी पाण्याच्या बाटलीतून साधूंच्या हातात असणाऱ्या ग्लासमध्ये पाणी ओतत होते. नेमक्या याचक्षणी कोणी तरी फोटो टिपला आणि इंटरनेटवरील सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तो एडिट केला. वेगवेगळ्या टुल्सचा वापर करून पाण्याच्या बाटलीऐवजी तिथे दारूची बाटली ठेवली. त्यानं मौलवीच्या हातात तर दारूची बाटली दाखवली. पण साधूच्या हातात असलेल्या पाण्याचा ग्लास मात्र तसाच ठेवला, या एका चुकीमुळे व्हायरल झालेल्या फोटोचं सत्य उघड झालं.