27 February 2021

News Flash

दोन्ही पाय नसतानाही त्याने खांबावर चढून केलं ध्वजारोहण, आनंद महिंद्रांनी ट्विट केला व्हिडीओ

रविवारी देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला

रविवारी देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण हा दिवस रविवारी साजरा करताना दिसत होते. प्रत्येक जण आपल्याला जसं शक्य आहे त्या पद्धतीने हा दिवस साजरा करत देशाप्रती असलेलं आपलं प्रेम आणि आदर या दिवशी व्यक्त करत असतो. दरम्यान महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही भारतीय असल्याचा अभिमान वाटेल.

आनंद महिंद्रांनी ट्विट केलेल्या या व्हिडीओत दोन्ही पाय नसेलला तरुण खांबावर चढत असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे या खांबावर कोणताही झेंडा नाही. पण त्याच्या शरीरावर असणाऱ्या तिरंग्यामुळे तरुण तेव्हा खांबाच्या टोकाला पोहोचतो तेव्हा जणू काही तिरंगाच फडकत आहे असा भास होतो.

हा व्हिडीओ ट्विट करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिलं आहे की, “मी हा व्हिडओ कालच पोस्ट केला असता, पण आज सकाळी मला तो मिळाला. पण असं प्रेरणा देणारं, स्वत:बद्दल सारखं वाईट वाटून घेणं थांबवणारं तसंच मोठी इच्छा असेल तर मोठ्या गोष्टी करण्याची प्रेरणा देणारं असं काहीतरी पाहण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2020 11:07 am

Web Title: anand mahindra tweet inspirational video republic day sgy 87
Next Stories
1 देशाचा नकाशाच बदलला : राष्ट्रवादी काँग्रेसकडून शुभेच्छा देताना मोठी चूक
2 क्या है *** ! कॅमेरासमोर मार्टीन गप्टीलने घेतली चहलची फिरकी
3 वाघोबाला पाहण्यासाठी ‘क्रिकेटचा देव’ ताडोबाच्या जंगलात
Just Now!
X