News Flash

नेटिझन्स काहीही करु शकतात, #AnythingCanHappen हॅशटॅगवर रंगले नवे चर्चासत्र

सोशल मीडियावर आजच्या घडीला काहीही होऊ शकते....

सोशल मीडियावर सध्या कागदपत्रांचे जतन करण्याचा संदेश देणारी जाहिरात लोकप्रिय होत आहे. (छायासौजन्य ट्विटर)

आजच्या घडीला सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी फक्त निमित्त हवे असते. मग कोणती जाहिरात असो चित्रपटाबाबतची चर्चा असो किंवा एखादे राजकीय अथवा लोकप्रिय कलाकाराचे वक्तव्य. नेटिझन्स सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त व्हायला सुरुवात होते. हॅशटॅग तयार करुन आपापल्या परिने व्यक्त होण्यास सुरुवात होते. तरुणाईच्या या हटके अंदाजाने पंजाब नॅशनल बॅकेच्या जाहिरातीनंतर तरुणाई आपल्या अंदाजात व्यक्त होताना दिसत आहे. मुंबईकरांनी या जाहिरातीच्या निमित्ताने ट्विटरवर #AnythingCanHappen हा हॅशटॅग ट्रेंडीगमध्ये आणला आहे.

पंजाब नॅशनल बँकने (पीएनबी) मेट लाइफ इन्फिनिटिचे नवे अॅप बाजारात आणले. या अॅपची जाहिरात सध्या सोशल मीडियावर अधिक लोकप्रिय होत आहे. कागदपत्रांची काळजी घेण्याची आवश्यकता का आहे, हे सांगण्याचा प्रयत्न या जाहिरातीतून करण्यात आल्याचे दिसते. आपले आयुष्य ज्या कागदावर अर्थात प्रमाणपत्रावर आधारित असते त्याचा दुसऱ्या व्यक्तीकडून कसा दुरुपयोग केला जाऊ शकतो. हे या जाहिरातीमध्ये टिपले असून कागदपत्राची काळजी घेतली नाही तर काहीही होऊ शकते, असे दाखविण्यात आले आहे. या जाहिरातीनंतर नेटिझन्सनी आयुष्यात काहीही होऊ शकते असे सांगताना वेगवेगळ्या विषयावर व्यक्त होण्यास सुरुवात केली.

#AnythingCanHappen या हॅश टॅगची कल्पना नेटिझन्सला एका जाहिरातीवरुन सुचली असली, तरी यावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया या भारत पाकिस्तान यांच्यातील संबंधापासून ते देशातील राजकारणावर नेटिझन्स व्यक्त होताना दिसत आहे. आताच्या घडीला राजकारणात काहीही होऊ शकते, असे सांगत एका नेटिझनने उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीचे उदाहरण दिले आहे. तर एका नेटिझनने दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी पाकिस्तान काहीही करु शकते, अशी प्रतिक्रिया दिली आहे. काही नेटीझन्स या हॅशटॅगवर आपल्या आवडत्या कलाकारांना शुभेछाही देताना दिसते. एका नेटीझन्सने नव्या अॅप फायदेशी असल्याचे सांगत पुढील पंचवीस वर्षे महत्वाची कागदपत्रे जतन करुन ठेवण्यास हे अॅप फायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 3:02 pm

Web Title: anythingcanhappen now trending on twitter
Next Stories
1 Viral Video : ट्रम्पही म्हणतात ‘अबकी बार ट्रम्प सरकार’
2 Video: ‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ चे कसब तुम्हाला थक्क करुन सोडेल
3 Video: लग्नात आले विघ्न, हटके फोटोशूट करताना नववधूची झाली फजिती
Just Now!
X