आपलं उत्पादन किती चांगलं आहे, हे ग्राहकांना पटवून देण्याची कला सेल्समनमध्ये असलीच पाहिजे. वस्तूत दहा दोष असले तरी चालतील पण तिच्यामधला एक चांगला गुण ग्राहकांना पटवून देण्याचं कौशल्य अनेक सेल्समनमध्ये असतं. पण कधी कधी कौशल्य दाखवण्याच्या नादात त्यांची फजिती होण्याची शक्यताही असते.

सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमधल्या सेल्समनचं घ्या ना! एका कारच्या शोरूममध्ये काही ग्राहक गाडी खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांच्यासमोर सेल्समन गाडीची वैशिष्ट्ये सांगत होता. या गाडीत असणाऱ्या स्वयंचलित दरवाजांच्या फिचरबद्दल सेल्समनने ग्राहकांना माहिती दिली होती. मात्र, डेमोच्यावेळी उद्भवलेल्या तांत्रिक बिघाडामुळे या सेल्समनची चांगलीच नाचक्की झाली. सेल्समन ग्राहकांना गाडीचा डेमो देत असताना स्वयंचलित दरवाजांची यंत्रणा काम करेनाशी झाली. त्यामुळे सेल्समनची मान दरवाज्यामध्ये अडकली. ग्राहकांसमोर झालेल्या फजितीमुळे बिच्चारा सेल्समन चांगलाच गांगरून गेला. शेवटी धडपड करून त्यांनी स्वत:ची सुटका करून घेतली. या फसलेल्या प्रयोगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अटकेत असलेल्या सौदी प्रिन्सची ‘ती’ राजकन्या मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत

VIDEO : धुकं की धबधबा?, पाहा निसर्गाचा चक्रावून टाकणारा चमत्कार