Loksabha Election 2024 Viral Video: लाइटहाऊस जर्नलिज्मला राजस्थानचे आमदार डॉ किरोड़ी लाल मीणा यांची ९ सेकंदाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात असल्याचे लक्षात आले. व्हिडीओमध्ये ते कथितपणे “भाजपने ४०० जागा जिंकल्या तर मोदी केवळ आरक्षण संपवणार नाहीत, तर राज्यघटनाही बदलतील” असे म्हणताना दिसत होते. नेमकं यात किती तथ्य आहे हे पाहूया.

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Murari Sharma ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Varsha Gaikawad Congress
उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर; भाजपाकडून पूनम महाजन यांच्याबाबत मौन
Congress flag
ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ नेत्याचा भाजपात प्रवेश
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
Rohit Pawar vs Ravi Rana over amravati rally
“फक्त ३०० मिळाले? नवनीत राणांच्या सभेसाठी महिलांना पैसे दिले?”, रवी राणा म्हणाले, “हो पैसे वाटले…”
Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली
Sharad Pawar press conference _ 4
“त्यांची फाईल आज टेबलवरून कपाटात, पण उद्या…”, भाजपाबरोबर गेलेल्या नेत्यांना शरद पवारांचा इशारा

इतर वापरकर्ते देखील व्हायरल व्हिडीओ क्लिप शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडिओवरून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला. फर्स्ट इंडिया न्यूजच्या यूट्यूब चॅनेलवर २ दिवसांपूर्वी अपलोड केलेली एका मिनिटाची क्लिप आम्हाला आढळली.

व्हिडिओमध्ये किरोडी लाल मीना म्हणाले, “निवडणुकीत भाजप पक्षाने ४०० जागा जिंकल्या तर ते केवळ आरक्षणच संपवणार नाहीत, तर संविधानही बदलतील, असे सांगून काँग्रेस लोकांची दिशाभूल करत आहे.” ते पुढे म्हणाले की, देशभरात अफवा पसरवल्या जात असून जनतेची मते मिळविण्यासाठी काँग्रेस हे करत आहे. बाडमेरच्या सभेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले तरी ते संविधान बदलू शकणार नाहीत. अमित शहा यांनी आरक्षणाबाबत काहीही बदल होणार नसल्याचे सांगितले. त्यांनी व्हिडिओच्या शेवटी भाजप उमेदवार ओम बिर्ला यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही किरोडी लाल मीना यांचे एक्स हॅन्डल तपासले.

त्यांनी त्यांच्या विधानाबाबत स्पष्टीकरण जारी केल्याचे आम्हाला आढळले. ते म्हणाले की त्यांचे अपूर्ण विधान सोशल मीडियावर शेअर केले जात आहे आणि जर खोट्या बातम्या देणाऱ्यांनी असे प्रकार करणे थांबवले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल.

आम्हाला भाजप राजस्थान एक्स हँडलची एक पोस्ट देखील सापडले ज्याने स्पष्ट केले की भाजप नेते किरोडी लाल मीना यांनी व्हायरल विधान दिले नाही.

हे ही वाचा<< “३७० लागू करू, मशिदीला जागा देऊ..”, काँग्रेसच्या बड्या नेत्याचं मुस्लिमांना आश्वासन? Video तील वाक्य आधी नीट ऐका

निष्कर्ष: राजस्थानचे भाजप नेते डॉ किरोडी लाल मीना यांनी असे म्हटले नाही की जर भाजपने ४०० जागा जिंकल्या तर पंतप्रधान मोदी आरक्षण संपवतील आणि संविधान बदलतील. व्हायरल व्हिडिओ क्लिप एडिट करण्यात आली असून हा दावा खोटा आहे.