आपल्याकडे चोर कधी कधी फारच मजेशीर वागतात बुवा. चित्रपटात दाखवतात तशी चोरी करायाला जातात आणि तोंडघशी पडतात. हरिणायामध्येही असंच झालं बघा. दोन अशिक्षित चोर बंदुक घेऊन बँकेत शिरले. इथे तिथे पाहून सरळ कर्मचा-यांवरच बंदुक रोखली आता बंदुकधारी चोर शिरले म्हटल्यावर बँकमधल्या महिला कर्मचा-यांनी आरडाओरडा सुरू केला. त्या पोलिसांनी फोन करतील या भितीने या चोरांनी महिलांना मारायाला सुरूवात केली.
बँकेमधली रोकड बंदूकीच्या धाकाने या चोरांनी लुटली आणि हे बाहेर पळणार एवढ्यात या दोन धाडसी महिलांनी या चोराला दरवाज्यात रोखून ठेवले. बँकमधल्या इतर कर्मचा-यांनी देखील या महिलांना मदत करत चोरांना पकडून ठेवले. त्यातल्या एकीने प्रसंगावधानता दाखवत इतर लोकांना बोलावून आणले. या सगळ्यांनी मिळून या दोन चोरांना असा काही चोप दिला की यापुढे चोरी करण्याचा विचार ते मनातही आणणार हे नक्की. बघा या फिल्मी स्टाईलने चोरी करणा-या चोरांची कशी धुलाई केली ते.
#WATCH: Two women bank staff members foil robbery bid by armed men, who were later thrashed by people in Gurugram, Haryana pic.twitter.com/xlIOFuUxpJ
— ANI (@ANI_news) April 4, 2017
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2017 4:23 pm