कोणत्याही शेतकऱ्यासाठी शेती आणि गोठ्यातील जनावरेच खरी संपत्ती आसते. शेतकऱ्यांसाठी जनावरे कुटुंबातील सदस्यांसारखी असतात. जनावरांसोबत कोणत्याही शेतकऱ्याचे भावनिक नाते असते. जनावराची स्वास्थ आणि सुरक्षेसाठी शेतकरी काहीही करायला तयार होतो. सध्या गुजरातमधील एका शेतकऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्यामध्ये तो आपल्या गायींना वाचवण्यासाठी चक्क सिंहासोबत झुंजल्याचे पहायला मिळतेय.

यूट्यूबवरील या सीसीटीव्ही फुटेजमघील ही घटना १८ जून (मंगळवार) रोजीची आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, राष्ट्रीय उद्यानाजवळ देवसिंह वढेर या शेतकऱ्याचे घर आहे. मंगळवारी रात्री अचानक त्याला आपल्या गायींचा ओरडण्याचा आवाज आला. ज्यावेळी वढेर घराबाहेर आले, त्यावेळी सिंहाने गायींवर हल्ला केल्याचे त्याला समजले.

३० सेंकदाच्या व्हिडीओमध्ये दिसतेय की, सिंहाने गायीच्या एका वासराला आपल्या तोंडात पकडलेले आहे. वढेरा जवळच आसलेला लाकडाचा दांडा उचलतात. त्यानंतर मोठ्या हिंमतीने त्यांनी सिंहाच्या डोक्यावर त्या लाकडी दांड्याने हल्ला करतात. डोक्यावर मार लागल्यानंतर सिंहाने तोंडातील वासराला सोडून घराच्या कंपाऊडवरून पळ काढला.

या सर्व प्रकारावर वढेरा म्हणाले की, आठवड्यातून दोन वेळा जंगली जनावरांचा गायींवर हल्ला होते. त्यामुळे मला सतर्क रहावे लागते. सिंहाच्या जबड्यातील वासरू फक्त पाच महिन्याचे होते आणि ते माझ्या ह्रद्याच्या खूप जवळ आहे.