आजच्या इंटरनेटच्या जगामध्ये केवळ वृत्तवाहिन्यांवर अवलंबून न राहता सोशल नेटवर्किंग आणि इंटरनेट बातम्यांचा सर्वात मोठा स्त्रोत ठरत आहे. असे असतानाही अनेक वृत्तवाहिन्यांना मिळणारा प्रतिसादही वाढताना दिसत आहे. आज अनेक वृत्तवाहिन्यांचा पर्याय प्रेक्षकांकडे उपलब्ध आहे. तरी आजही अनेकांना दूरदर्शनच्या बातम्यांआधी लागणारे संगीत (ट्यून) आजही लक्षात आहे. सध्या दूरदर्शनच्या याच संगीताची इंटरनेटवर चर्चा आहे. त्याला कारण म्हणजे या ट्यूनवर एका तरुणाने केलेला ब्रेक डान्स.

टीकटॉक या लोकप्रिय अॅपवरील अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. असाच एक व्हिडीओ विरारमधील वैशाख नायर या तरुणाने तयार केला आहे. या व्हिडीओमध्ये वैशाख चक्क दूरदर्शनच्या संगीतावर ब्रेक डान्स करताना दिसत आहे. प्रत्येक बीटवर त्याने केलेल्या परफेक्ट स्टेप्स नेटकऱ्यांच्या पसंतीस पडल्या असून सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आपला हा व्हिडीओ शेअर करताना त्याने ‘दूरदर्शनने आपल्या स्वप्नातही याचा विचार केला नसेल’ अशी कॅप्शन वापरली आहे.

हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर या व्हिडीओ काही तासांमध्ये एक लाख ७८ हजार व्ह्यूज मिळाले असून पाच हजारहून अधिक युझर्सने कमेन्ट केल्या आहेत. ट्विटवरही या व्हिडीओची चर्चा सुरु आहे. अनेकांनी ट्विटवरून हा व्हिडीओ आपल्याला आवडला असल्याचे मत नोंदवले आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत नेटकरी या व्हिडीओबद्दल बोलताना…

भारीय हे

हा पोरगा स्टार झालाय

हा पोरगा जनरेटरच्या आवाजावर पण नाचू शकतो

केजरीवाल यांनाही केले लाइक

मस्त डान्स

बापरे

डीडीने कधी विचारही नसेल केला

हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की दूरदर्शन नॅशनलच्या ट्विटर हॅण्डलवरुनही या व्हिडीओला लाइक करण्यात आले आहे.

महिन्याभरापूर्वी एका तरुणाने टीकटॉक या अॅपवर दूरदर्शनच्या याच ट्यूनचा एक व्हिडीओ तयार केला होता. तो व्हिडीओही चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता.

या व्हिडीओमुळे वैशाख रातोरात स्टार झाला आहे. तो या ट्विटवरील अनेक ट्विटसला स्वत: रिप्लाय करुन उत्तरे देताना दिसत आहे. अनेकांनी टीकटॉकवरुन अखेर चांगले व्हिडीओही दिसू लागल्याबद्दल समाधान व्यक्त करत वैशाखला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.