लग्नाच्या स्टेजवर नवऱ्याने फोटोग्राफरला मारल्यानंतर हसून लोटपोट झालेल्या एका ‘नवरी’चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. आता त्या व्हिडिओबाबत एक नवीन माहिती समोर आली असून व्हिडिओत दिसणाऱ्या ‘नवरी’नेच व्हिडिओमागची खरी कहाणी सांगितली आहे.

काय आहे व्हायरल व्हिडिओत :-
एका लग्नातला हा व्हिडिओ असून एक फोटोग्राफर स्टेजवरती नवरा-नवरीचे फोटो घेताना दिसतोय. फोटोग्राफर स्टेजवरती उभ्या असलेल्या नवरा-नवरीचे फोटो क्लिक करतो. सुरूवातीला तो दोघांचे एकत्र फोटो क्लिक करतो, पण नंतर तो नवऱ्याला बाजूला होण्यास सांगतो, आणि फक्त नवरीचे फोटो घेण्यास सुरूवात करतो. नवरीचे फोटो घेण्यात फोटोग्राफर इतका मग्न होतो की नवऱ्याकडे बघतही नाही. थोड्यावेळाने क्लोजअप फोटोशूटसाठी फोटोग्राफर नवरीच्या जवळ जाऊन तिचा चेहरा पकडून योग्य पोजिशन सांगतो, ते बघून बाजूला उभा असलेला नवरा इतका चिडतो की, तो फोटोग्राफरच्या जोरदार ‘टपली’ मारतो. हे बघून नवरीला हसू आवरणं कठीण होतं. ती हसून इतकी लोटपोट होते की चक्क स्टेजवरती बसूनच जोरजोरात हसायला लागते. हे दृश्य बघून उपस्थित पाहुणेमंडळींमध्येही एकच हशा पिकतो. लाखो लोकांनी हा व्हिडिओ बघितला असून त्यावर अनेक मजेशीर कमेंट्स येत आहेत.

nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
Mumbai, expensive mobile phones
मुंबई : ऑनलाईन फसवणूक करून महागड्या मोबाईलची खरेदी
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते


खरी कहाणी काय?
रेणुका मोहन नावाच्या ट्विटर युजरने सर्वप्रथम हा व्हिडिओ ट्विट केला होता. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आता व्हिडिओत दिसणाऱ्या ‘नवरी’ने व्हिडिओमागची खरी कहाणी सांगितली आहे. रेणुका मोहन यांच्या ट्विटला रिप्लाय देताना अनिक्रिती चौहान नावाच्या तरुणीने, हा व्हिडिओ माझ्या चित्रपटातील एक दृष्य असल्याचं सांगितलं आहे. चित्रिकरणादरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचं तिने सांगितलं, तसेच व्हिडिओ शेअर केल्याबद्दल रेणुका मोहन यांचे आभारही मानले. अनिक्रिती चौहानने स्वतःच्या इंस्टाग्रामवरही व्हिडिओ शेअर केला असून ‘डार्लिंग प्यार झुकता नहीं’ या चित्रपटातला व्हिडिओ असल्याचं सांगितलं आहे.


अनिक्रिती चौहान ही छत्तीसगडमधील एक तरुण अभिनेत्री असल्याचं समजतंय.