News Flash

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जुमला दिनाच्या शुभेच्छा: काँग्रेस

ट्विटर वॉरमुळे ट्विपल्सची मात्र करमणूक झाली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

एप्रिल फूलनिमित्त काँग्रेसने सोशल मीडियावरुन भाजपावर खोचक टीका केली आहे. जुमला दिनाच्या शुभेच्छा, असे ट्विट करत काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला असून काँग्रेसने सुरु केलेला #HappyJumlaDivas हा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेंड करत आहे. अनेकांनी एप्रिल फूलनिमित्त भाजपा सरकारने दिलेल्या आश्वासनांची खिल्ली उडवली आहे.

देशभरात १ एप्रिल हा दिवस ‘फूल्स डे’ म्हणून ओळखला जातो. ‘फूल्स डे’च्या निमित्ताने काँग्रेसने थेट भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन रविवारी एक ट्विट करण्यात आले. ‘बँक खात्यात १ एप्रिल २०१८ रोजी १५ लाख रुपये जमा झाले असून रेफरन्स क्रमांक ‘भाजपा४२०’. बँक खात्यातील एकूण जमा रक्कम 0.00 रुपये’, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. हे ट्विट करताना काँग्रेसने #HappyJumlaDivas हा हॅशटॅग दिला.

दुसऱ्या ट्विटमध्ये काँग्रेसने नीरव मोदी प्रकरणावरुन भाजपावर निशाणा साधला. बहुत हुआ भ्रष्टाचार, लेकिन नीरव मोदी अपना है यार, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. भाजपाचा उल्लेख भारतीय जुमला पार्टी असा करण्यात आला.

बघता बघता या हॅशटॅगला ट्विटरवरुन चांगला प्रतिसाद मिळू लागला. काँग्रेस समर्थकांनी तर भाजपावर अक्षरश: टीकेची झोड उठवली. दोन पक्षांमधील या ट्विटर वॉरमुळे ट्विपल्सची मात्र करमणूक झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 11:51 am

Web Title: congress hits out at bjp on april fool day happyjumladivas trending on social media
Next Stories
1 April Fool’s Day 2018 : काय आहे ‘एप्रिल फुल’ची गोष्ट?
2 April Fool Day 2018: इतरांना April Fool करण्याच्या काही धमाल ट्रिक्स
3 १६ दिवसांच्या बालकाला घेऊन माकड फरार, वन विभागाकडून कसून शोध
Just Now!
X