लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्याला सोमवारपासून देशभरात सुरूवात झाली. पहिल्या दोन टप्प्यांनंतर तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेताना केंद्र सरकारनं काही प्रमाणात शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर राज्यांनीही स्थानिक परिस्थितीचा विचार काही निर्णय घेतले आहेत. यात दारूची दुकानं सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. दारूची दुकानं उघडणार म्हणून तळीरामांनी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र दिसत आहे. असाच एक व्हिडिओ आता उत्तराखंडमधील नैनिताल येथून समोर आला आहे. येथे मंगळवारी गारांचा पाऊस पडला. मात्र असा परिस्थितीमध्येही दारुच्या दुकानांसमोर लोकं छत्र्या घेऊन उभे असल्याचे चित्र पहायला मिळालं. यासंदर्भातील व्हिडिओ ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने ट्विटवर पोस्ट केला आहे.

नैनितालमधील मॉल रोडवरील व्हिडिओ एएनआयने पोस्ट केलेला आहे. नैनितालमध्येही सोमवारपासून दारुची दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. लोकप्रिय पर्यटनस्थळ असणाऱ्या नैनितालमध्ये मंगळवारी गारपीट झाली. मात्र अशा परिस्थितीमध्येही लोकं दारुच्या रांगेत उभी असल्याचे चित्र दिसले. एकीकडे अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचं भान न राहिल्याचे चित्र देशभरात दिसत असताना नैनितालमध्ये मद्यप्रेमींनी अगदी कडेकोटपणे सरकारी नियमांचे पालन करत मद्य खरेदीसाठी रांगा लावल्याचे पहायला मिळालं. एक हजारहून अधिक जणांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्याला सोमवारपासून देशभरात सुरूवात झाली. पहिल्या दोन टप्प्यांनंतर तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेताना केंद्र सरकारनं काही प्रमाणात शिथिलता देण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक राज्यांनीही स्थानिक परिस्थितीचा विचार काही निर्णय घेतले. याच निर्णयांमध्ये अनेक राज्यांची दारूची दुकानं सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्याचे ठरवले. दारूची दुकानं उघडणार म्हणून सोमवारी अनेक राज्यांमधील शहरांमध्ये तळीरामांनी लांबच लांब रांगा लावल्याचे चित्र पहायला मिळालं. मद्याच्या मोहापुढे तळीरामांना सोशल डिस्टसिंगचाही विसर पडला त्यामुळे पोलिसांना काही ठिकाणी सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर तळीरामांना पोलिसांच्या लाठ्या खाऊन घरी पळावं लागलं.