News Flash

Scary! नदीमधून जाताना मगरीने केला हल्ला, कॅमेरात कैद झाला थरार

व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला

नॉर्थ कॅरोलिनामधील कायकेरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. CNN च्या रिपोर्ट्सनुसार पीट जॉयस नावाचा एक व्यक्ती Waccamaw नदीत अडकला होता. त्याचवेळी एका मगरीने त्याच्या बोटीवर हल्ला केला. जॉयसने Youtube वर या घटनाचा संपूर्ण व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यासोबत त्यानं कॅप्शनमध्ये लिहलेय की, जनावरांनी माझं खूप जोशमध्ये स्वागत केलं.

पीट जॉयस म्हणतात की, देवाच्या कृपेमुळे मगरीच्या हल्लायतून वाचलो. मगरीने हल्ला केल्यानंतर एका झाडाच्या फांदीचा आधार घेतल्यामुळे बोट पलटली नाही. तसेच योग्य वेळ साधून मी तेथून तात्काळ पळ काढला. पण मगरीनं माझा दूरपर्यंत पाठलाग केला.

एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, जॉयस म्हणाले की, मगरीला पाहिल्यानंतर मी बोट वेगानं चालवायला सुरूवात केली. वेगामुळे माझी नाव पलटली असती. पण देवाच्या कृपेमुळे असं काही झालं नाही. मला आजही तो थरारक अनुभव आणि दिवस आठवणीत आहे. मगरीनं संपुर्ण ताकदीनं बोटीवर हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे बोटीचं संतुलन बिघडलं अन् नदीत पडता पडता वाचलो. पाण्यातूनही मगरीनं दोन-तीनदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण मी संधी मिळताच तेथून पळ काढला.

या थरारक अनुभवाच्या व्हिडीओल नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. YouTubeवर या व्हिडीओला सहा लाखांपेक्षा जास्त जणांनी पाहिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 11:14 am

Web Title: crocodile attacked man into water scary video goes viral on social media nck 90
Next Stories
1 मिळालं चुकीचं लॉटरीचं तिकिट; झाला कोट्यधीश
2 सासूने रागात काढलेलं मास्क अन् शिल्ड मास्कमधून चुंबनाचा प्रयत्न; करोना ट्विस्टमुळे ‘ही’ मालिका झाली ट्रोल
3 का होतोय बेबी पेंग्विन ट्रेंड? आदित्य ठाकरेंशी काय आहे संबंध?
Just Now!
X