दिल्लीतील एका प्रसिद्ध हॉटेलमधील खाद्यपदार्थात मृत पाल आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजधानीतील कॅनॉट प्लेस परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलमधील जेवणात पालीचे मृत पिल्लू आढळलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असता हॉटेलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॅनॉट प्लेस परिसरातील सरवना भवन या प्रसिद्ध हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये मित्रासोबत पंकज अगरवाल जेवण्यासाठी गेले होते. त्यावेळी मागवलेल्या सांबरमध्ये त्यांना पाल आढळली. सांबर घेत असताना आर्धी पाल चमच्यावर आली. पंकज यांच्यासोबत असलेल्या मित्राने तातडीने याचा व्हिडीओ बनवला. तसेच फोटोही घेतलो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याप्रकरणी पंकज अगरवाल यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी हॉटेलविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पंकज अगरवाल बोलतानाही दिसत आहेत. ते म्हणतात की, ” तोंडातून हा घास घास. अर्धी पाल गायब आहे.”

पंकजसोबत आलेल्या दुसऱ्या व्यक्तीनं तो घास हातात घेत हॉटेलचं नाव व्यवस्थित दिसेल असा फोटो काढला आहे. तो व्यक्ती पंकजला म्हणतो की, इथे उभारुन फोटो काढ, हॉटेलचं नाव दिसेल.