18 February 2019

News Flash

Video : चोरी करण्याआधी चोराने दुकानासमोर केला डान्स

यावेळी तो बरोबर सीसीटीव्हीसमोर अशाप्रकारे सादरीकरण करत होता की जणू प्रेक्षक त्याला पाहत आहेत.

चोर चोरीसाठी कधी काय शक्कल लढवतील सांगता येत नाही. चोरी केल्यानंतर त्याचे यश साजरे करण्यासाठी चोराने डान्स केल्याचे व्हिडियो याआधीही समोर आले होते. मात्र आता समोर आलेल्या एका व्हिडियोनुसार, हा चोर चोरीला जाताना डान्स करत आपल्याला चोरी करण्याचा होत असलेला आनंद व्यक्त करताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. दिल्लीतील एक दुकान फोडण्यासाठी गेला होता. या चोराच्या डान्सचा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

विशेष म्हणजे चोर डान्स करताना आपल्या शर्टाची बटणे काढतो. मग काही स्टेप्सचे सादरीकरण करत तो अतिशय खुश होऊन डान्स करतो. यावेळी तो बरोबर सीसीटीव्हीसमोर अशाप्रकारे सादरीकरण करत होता की जणू प्रेक्षक त्याला पाहत आहेत. त्यानंतर तो रुमालाने आपले तोंड झाकतो आणि इतर दोन सहकाऱ्यांबरोबर दुकानाजवळ जातो. मग हे तिघे मिळून दुकानाचे दार उघडताना दिसते. हा व्हिडियो एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर अपलोड केला आहे.

याआधी कॅलिफोर्नियामधल्या एका इमारतीमधला एक व्हिडियोही व्हायरल झाला होता. चोरानं बनावट किल्ली तयार करून ऑफिस फोडलं. इथल्या महत्त्वाच्या वस्तू लुटल्या. ही लूट यशस्वी झाल्यानंतर चोरानं चक्क ब्रेकडान्स करत आपला आनंद साजरा केला. ऑफिसमध्ये सीसीटीव्ही आहेत याचा त्याला कदाचित विसर पडला असावा. पोलिसांनी त्याच्या ब्रेक डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता, जो मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला होता.

First Published on July 12, 2018 4:51 pm

Web Title: delhi thief done dance before robbery video going viral