एखादी टोलेजंग इमारत बांधण्यासाठी अनेक वर्षे लागतात, पण जमीनदोस्त करण्यासाठी मात्र काही सेकंदच खूप असतात. युएईच्या अबूधाबीमध्ये तब्बल 144 मजली इमारत अवघ्या 10 सेकंदांमध्ये जमीनदोस्त करण्यात आली. आता या इमारतीचं नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नमूद झालं आहे. कारण इतकी उंच इमारत यापेक्षा कमी वेळेत यापूर्वी कधीही जमीनदोस्त करण्यात आली नव्हती.

बघा व्हिडिओ :-

हा व्हिडिओ ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’च्या फेसबुक पेजवरुन 8 डिसेंबर रोजी शेअर करण्यात आला आहे. 26 नोव्हेंबर रोजी ही इमारत पाडण्यात आली. अबूधाबीच्या मीना प्लाझामधील ही इमारत डायनामाइट स्फोट करुन पाडली. 165.032 मी. (541.44 फूट) इतकी या 144 मजली इमारतीची उंची होती. इमारत जमीनदोस्त करतेवेळी जवळच्या परिसरातील बाजारपेठ आणि दुकानं बद करण्यात आली होती.