11 December 2017

News Flash

चहावाल्याची सर्कस बघून तुम्हीही पोट धरुन हसाल…

आणि त्याला मिळाली प्रसिद्धी

लोकसत्ता ऑनलइन | Updated: October 4, 2017 10:30 AM

सोशल मीडिया म्हणजे कोणतीही गोष्ट व्हायरल होण्याचे एक साधन, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नुकताच एक अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे एका अतिशय सामान्य चहावाल्याला प्रसिद्धी मिळाली आहे. आता तो इतक्या कमी वेळात इतका प्रसिद्ध कसा झाला? तर त्याच्या चहा करण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे ही बाब चर्चेत आली आहे.

भारतामध्ये चहा म्हणजे जणू अमृतच. काहीजण दिवसाच्या कोणत्याही वेळेला कितीही चहा पिऊ शकतात. झोपेतून उठल्यावर, मिटींगमध्ये, कोणीतरी भेटले म्हणून अशी चहा पिण्यासाठी कोणतीही कारणे चालतात. मग हा चहा एखाद्या टपरीवरचा असूदे किंवा अगदी फाईव्हस्टार हॉटेलमधला. तो तितक्याच आवडीने प्यायला जातो. भारतात तर अगदी चौकाचौकात चहाची दुकाने आणि गाड्या असतात. अशाच एका चहाच्या गाडीवरील एका मुलाचा डान्स करत चहा बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याच्या या अनोख्या पद्धतीमुळे तो रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

चहा तयार करण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत असते असे आपण म्हणतो. पण या मुलाची पद्धत इतकी वेगळी आहे, की त्याला पाहून तुम्ही नक्कीच तो पुढे काय करतो ते उत्सुकतेने पाहत बसाल. तो असा झपाटल्यासारखा का करतोय असा प्रश्नही आपल्याला पडतो. पण त्याच्या आजुबाजूचे लोक त्याला प्रोत्साहन देताना दिसतात. इतकेच नव्हे तर अशाप्रकारे नाचता-नाचता तो आपल्या आसपास असणाऱ्यांना चहा पिण्याचा आग्रहही करतो. त्याची पिंगा घालण्याची पद्धत, नाचतानाचता चहामध्ये टाकत असलेले जिन्नस आणि तेवढ्यातच त्याने धुतलेले ग्लास व्यवस्थित पाहिल्यास आपल्याला दिसू शकतात. मात्र हा अनोखा व्हिडिओ पाहून नेटीझन्सना आपले हसू आवरत नसल्याचे पहायला मिळते. तर अनेक जण त्याच्या या अशा चहा करण्याच्या पद्धतीमुळे आश्चर्यचकीत झाल्याचेही दिसते. ते काहीही असो पण आपल्याकडे चहावाल्यांना मिळणारी प्रसिद्धी हा एक अतिशय महत्त्वाचा विषय म्हणायला हवा.

First Published on October 4, 2017 10:30 am

Web Title: different type of making tea by boy going viral on social media