News Flash

..म्हणून डॉक्टरनं ३५ लाखांची स्पोर्ट्सकार कचरा वाहून नेण्यासाठी वापरली

ही कार त्यांना वडिलांनी भेट म्हणून दिली होती. तिचा वापर त्यानं कचरा वाहून नेण्यासाठी केला आहे. पण असं करण्यामागे एक कारण आहे.

भारतातील काही मोजक्या स्पोर्ट्स कारपैकी अभिनीत यांची आहे.

भोपाळमधला तरुण डॉक्टर अभिनीत गुप्ता सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलाय. कारण त्यानं आपल्या स्पोर्ट्सकारचा वापर चक्क कचरा वाहून नेण्यासाठी केला होता. #70LakhKiKachraGadi हा हॅशटॅगही त्यानंतर सोशल मीडियावर चर्चेत आला होता. आता त्यानं आपल्या आलिशान स्पोर्ट्सकारला कचरा वाहून नेणारी ट्रॉली का जोडली आणि ही स्पोर्ट्सकार ‘कचरागाडी’ कशी काय झाली असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे तर त्यामागे एक कारण आहे.

पितृप्रेम! वडिलांसाठी मुलानं नव्या कोऱ्या BMW ची केली शवपेटी

स्वच्छ भारत अभिनयाचा प्रचार करण्यासाठी, लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी अभिनीत यांनी आपल्या कारला ट्रॉली जोडली होती. आपण घर स्वच्छ ठेवतो मग आपला आजूबाजूचा परिसर का नाही? हा प्रश्न त्याला सतावतो म्हणूनच त्यानं आपल्या गाडीला ट्रॉली अडकवून कचरा वाहून नेला आहे. अभिनीतच्या स्पोर्ट्सकारची किंमत ३५ लाखांच्या आसपास असल्याचं समजत आहे. भारतातील काही मोजक्या स्पोर्ट्सकारपैकी अभिनीत यांची स्पोर्ट्सकार आहे. ही कार त्यांना त्यांच्या वडिलांनी भेट म्हणून दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 5:49 pm

Web Title: doctor uses rs 35 lakh sport car to carry garbage
Next Stories
1 पितृप्रेम! वडिलांसाठी मुलानं नव्या कोऱ्या BMW ची केली शवपेटी
2 FIFA 2018 : फुटबॉलचा निस्सीम चाहता, चहाविक्रेत्यानं अर्जेंटिना संघाच्या प्रेमापोटी केला घराचा कायापालट
3 स्मृतीदिन विशेष : निवडक पु.ल. (किस्से)
Just Now!
X