पोलीस अधिकारी आपलं कर्तव्य पार पाडत असताना एका २८ वर्षीय तरूणाने अचानक चुंबन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. हैदराबादमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दारूच्या नशेत एक तरूण पोलीसाचे चुंबन घेत असल्याचे दिसत आहे. पोलिसांने तरूणाच्या या कृत्यानंतर त्याच्या कानशिलात लगावल्याचेही या व्हिडीओमध्ये दिसते.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील घटना रविवारी (२८ जुलै) रात्री बोनालू उत्सवाच्या दरम्यान घडली आहे. लोक रस्त्यावर डान्स करताना दिसत आहे. ड्युटीवर असलेला पोलीस अधिकारी तेथून जात असतो. पोलीस अधिकाऱ्याला पकडून तरूण चुंबन घेत असल्याचे स्पष्ट व्हिडीओत दिसत आहे. पोलिसाने तात्काळ त्याला धक्का देत कानशिलात लगावल्याचेही दिसत आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण केला असून २८ वर्षीय तरूणाला अटक केली आहे. एका खासगी बँकमध्ये तरूण काम करतो. नल्लाकुंता पोलिस स्टेशनचे निरीक्षक के. मुरलीधर म्हणाले की, भारतीय दंड संहिताच्या कलम 353नुसार तरूणावर गुन्हा दाखल केला आहे.