News Flash

Video: शरीर थकतं पण प्रेम नेहमीच तरुण असतं! ‘हा’ व्हिडिओ पाहून नेटिझन्स झाले भावूक!

टीव्ही अभिनेत्री दिलजित कौरनेही दिली यावर प्रतिक्रिया

प्रेम कधीच म्हातारं होत नसतं या उक्तीची प्रचिती सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून दिसत आहे. म्हातारं जोडपं करोना काळात एकमेकांची काळजी घेत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. हा भावनिक व्हिडिओ पाहून अनेकांना अश्रू अनावर होत आहेत. ९० च्या आसपास वय असलेला नवरा आपल्या पत्नीला बाटलीतून पाणी पाजत आहे. बायकोची तहान भागवण्यासाठी म्हाताऱ्या पतीची धडपड या व्हिडिओत दिसत आहे. लहान बाळाला दूध पाजतात तसं पाणी बायकोला पाणी पाजावं लागत आहे. पडलेलं पाणीही कपड्यानं पुसताना दिसत आहे.

हा व्हिडिओ फेमस पेज असलेल्या ‘जिंदगी गुलजार है’नं इंस्टाग्रामवर ४ एप्रिलला शेअर केला होता. या व्हिडिओला २ कोटीहून अधिक लोकांनी पसंती दिली आहे. या व्हिडिओखाली ‘झुरियां तो जिस्म पर आती है. इश्क तो हमेशा जवां रहता है’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

 

 

आयुष्याच्या शेवटापर्यंत प्रेमाचं नात जपत एकमेकांची काळजी घेणारा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच भावत आहे. टीव्ही अभिनेत्री दिलजीत कौर हा व्हिडिओ बघून भावूक झाली. या व्हिडिओखाली तिने हार्ट इमोजी शेअर केले आहेत.

प्रेम असावं तर असं शेवटच्या श्वासापर्यंत राहावं ही कमेंट्स एका युजर्सने दिली आहे. नेटकरी या व्हिडिओला खूप पसंती देत आहे. एकमेकांचं प्रेम बघून डोळ्यात पाणी आलं अशा प्रकारच्या कमेंट्स देत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2021 4:32 pm

Web Title: emotional video of elderly husband and wife viral on instagram srk 94
Next Stories
1 Coronavirus: “तातडीने कोरोनिल हवीय असं एकही ट्विट पाहिलं नाही”
2 अरे बापरे… माऊंट एव्हरेस्टवरही करोनाचा शिरकाव; हिमालयातील इतर शिखरांनाही ग्रासलं
3 Video : संत्र्याच्या बागेत रुग्णांवर उपचार, झाडांच्या फांद्यांना सलाईन लटकवून चढवलं ग्लुकोज
Just Now!
X