व्हॅलेंटाईन डे हा दिवस जगभरात जरी प्रेमाचा दिवस असला तरी आपल्या येथे या दिवसाला विरोध करणारे अनेक नेतेमंडळी आहेत. त्यामुळे हा दिवस साजरा करण्यास बंदी घालणे, व्हॅलेंटाईन गिफ्ट टाळणे, प्रेमी युगुलांना मारपीट करणे अशा अनेक घटना आपल्याकडे होत असतात. पण प्रेमी युगुलांना आजच्या दिवशी तरी प्रेम व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य द्या असा मानणारा एक वर्गही आहे. आता ही गोष्ट कशी सांगायची ही ज्याची त्याची पद्धत आहे. आता हेच बघना प्रेमी युगुलांना सुरक्षा द्यावी या मागणीसाठी बंगळूरुमधल्या एका राजकिय पक्षाने चक्क गाढवांचे लग्न लावून दिले.

वाचा : गुगलमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या चिमुकलीला पिचईंचे ‘सुंदर’ उत्तर

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पार्कमध्ये बसलेल्या प्रेमी युगुलांना मारहाण करण्याचे प्रकार अनेकदा घडतात. या जोडप्यांना सुरक्षा देणारा कायदा काढावा अशी मागणी येथल्या ‘कन्नड चलावली पक्षा’चे अध्यक्ष नागराज यांनी केली आहे. नवभारत  टाईम्सच्या बातमीनुसार या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गाढवाचे लग्न लावून दिले, गुलाबांचे फुल आणि गळ्यात माळा घातेल्या या गाढवांची कबन पार्क आणि आजूबाजूच्या परिसात वरातही काढली. प्रेमी जोडप्यांना सुरक्षा देणारा कायदाच करावा अशा मागणीसाठी त्यांनी या गाढव्याच्या लग्नाचा खटाटोप केला होता. नागराज यांना गाढवांबद्दल असेलले प्रेम सर्वज्ञात आहे, काही दिवसांपूर्वी गाढव देखील पवित्र प्राणी आहे असे वक्तव्य त्यांनी केली. २०१५ मध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेमविवाह करणा-या जोडप्यांना ५० हजार रुपये त्यांनी दिले होते.

वाचा : भारताला अंतराळात नेणाऱ्या महिला