‘गुगल’, जगातल्या सर्वोत्तम कंपनीपैकी एक. या कंपनीत आपल्यालाही नोकरी मिळावी असे कोणाला नाही वाटणार. सुखसुविधा, गलेलोठ्ठ पगार आणि चांगला ब्रँड अशा या मल्टीनॅशनल कंपनीत जगभरातील इंजिनिअर काम करतात. आता अशा कंपनीत काम करण्याची इच्छा एका सात वर्षांच्या मुलीला झाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. काही दिवसांपूर्वी युकेमध्ये राहणा-या एका सात वर्षांच्या मुलीने सुंदर पिचईंना पत्र लिहिले होते. मला गुगलमध्ये नोकरी करायला आवडेल असे पत्र तिने लिहिले होते. हौसेने लिहिलेल्या या पत्राला चक्क सीईओंचा रिप्लाय येईल अशी कल्पना तिच्या कुटुंबियांनी देखील केली नसेल. तिच्या पत्राला गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी उत्तर दिले आहे. हे पत्र आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा : मृत्यूपूर्वी जुळ्या भावाचे बहिणीसोबत शेवटचे क्षण कॅमेरात कैद

युकेमध्ये राहणा-या क्लोईने एक सुंदर पत्र लिहिले होते. ‘गुगलमध्ये काम करण्याचे माझे स्वप्न आहे. म्हणूनच मी तुम्हाला पत्र लिहित आहे. माझ्या वडिलांनी या कंपनीत अर्ज करायला सांगितला आहे मला पुढची प्रक्रिया माहित नसल्याने मी पत्र लिहित आहे’ असे पत्र चिमुकल्या क्लोईने गुगलला लिहिले होते याचबरोबर आपल्या छोट्या आवडी निवडी आणि छंदही तिने सांगितले. तिच्या वडिलांनी तिला रोबोट आणि कम्प्युटर देखील घेऊन दिला हेही सांगायला ती विसरली नाही. तिच्या पत्राची सुंदर पिचई यांनी दखल घेत उत्तरही दिले आहे.

वाचा : ‘अॅपल’च्या सीईओंचाच पगार कापला!

‘तूझ्या शाळेचे शिक्षण पूर्ण झाले की गुगलकडे तुझ्या नोकरीचा अर्ज नक्की पाठव. मी तुझ्या अर्जाची वाट बघतो आहे. पण त्याचबरोबर पुढच्या काही काळात स्वत:वर अशीच मेहनत घे आणि आपल्या स्वप्नांचा सतत पाठलाग कर असे सुंदर उत्तर पिचईंने तिला दिले. क्लोईच्या वडिलांनी या पत्राचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.