लहान मुलांच्या हाती मोबाइल सापडल्यानंतर ते काय करतील याचा नेम नाही. सोशल मीडियावर अनेकदा अशा घटना पहायला मिळतात ज्या पाहिल्यानंतर हसावं का रडावं हेच कळत नाही. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ब्राझीलमधील मुलाने कहर केला असून त्याने आपल्या आईच्या मोबाइलवरुन चक्क साडे पाच हजारांचं जेवण मागवलं.
मुलाने आईचा मोबाइल हाती येताच मॅकडॉनल्डला फोन करुन साडे पाच हजारांची ऑर्डर देऊन टाकली. मुलाच्या आईने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
फोटोमध्ये मुलगा ऑर्डर केलेल्या जेवणासोबत बसलेला दिसत आहे. यावेळी त्यांनी हे पहिल्यांदाच झालेलं नाही असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी मुलाने नेमकं काय काय मागवलं याची यादीच सोबत दिली आहे. मी हसले, रडले आणि नंतर सोबत बसून जेवणाचा आनंद घेतला सांगत महिलेने आपली काय परिस्थिती झाली होती हे सांगितलं आहे.
View this post on Instagram
ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून १ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. मुलाचा हा निरागसपणा पाहून नेटकरी प्रेमात पडले आहेत, तर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. मग काय तुम्हालाही असा एखादा अनुभव आला असेलच ना ?
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 26, 2020 3:57 pm