16 October 2019

News Flash

WhatsApp थीमची आगळीवेगळी लग्नपत्रिका

आगळ्यावेगळ्या लग्नपत्रिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

व्हॉट्सअॅप सर्वांच्या जिवाळ्याचा आणि जिवनातील अविभाज्या घटक बनला आहे. व्हॉट्सअॅपच्या साह्याने एकमेंकासोबतचा संवाद आधीक जलद झाला आहे. फोटो किंवा मेसेज क्षणभरात पाठवला जातो. हे पुरेसं नव्हत की काय? म्हणून गुजरातमधील एका जोडप्याने आपली लग्नपत्रिकाची थीमच व्हॉट्सअॅपची केली आहे. सोशल मीडियावर सध्या गुजरातमधील या जोडप्याची लग्नपत्रिका चर्चेचा विषय आहे.

फेब्रुवारीमध्ये त्यांचे लग्न आहे. त्यापूर्वी पाहुणे आणि जवळील व्यक्तीनां निमंत्रण देण्यासाठी व्हॉट्सअॅपच्या डिजायनची लग्नपत्रिका छापली आहे. या जोडप्याचे नाव आरजू आणि चिंतन असे आहे. दोघेही सुरतमध्ये राहतात. नवरदेव वेब डिजायनर आहे. त्यानेच आपल्या लग्नाची पत्रिका तयार केली आहे.

या अगळ्यावेगळ्या लग्नपत्रिकेचा रंग हिरवा आहे. तुम्हाला आमच्या लग्नाला यावं लागेल, अन्यथा व्हॉट्सअॅपवर तुम्हाला ब्लॉक केले जाईल, त्यावर असे व्हॉट्सअॅप स्टेटस टाकले आहे. दोघांचे फोटोही या पत्रिकेवर छापण्यात आले आहेत.

व्हॉट्सअॅप लोगोच्या ठिकाणी गणपतीचा फोटो लावण्यात आला आहे. ही आगळीवेगळी पत्रिका तयार करण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी लागला आहे. ‘इनव्हिटेशन कार्डला अनलॉक करा.’ असे पत्रिकेच्या कवरवर लिहले आहे.

First Published on January 7, 2019 3:56 pm

Web Title: gujarat couple designs whatsapp style invite for their wedding