गुजरातच्या सूरतमध्ये एक 13 वर्षीय मुलगी छेडछाडीची तक्रार करण्यासाठी पोलीस स्थानकात पोहोचली. रस्त्यात काही मुलांनी छेडछाड केल्याचा तिने आरोप केला होता. पण पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तिने हा बनाव रचल्याचं स्पष्ट झालं.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, गुरुवारी ही मुलगी शाळेतून उशीरा परत आली आणि रस्त्यात काही मुलांनी छेडलं अशी तक्रार तिने पालकांकडे केली. पालक तातडीने तिला घेऊन पोलीस स्थानकात पोहोचले. पोलिसांनी मुलीला सोबत घेतलं आणि तिने सांगितलेल्या घटनास्थळी पोहोचले. मुलगी पोलिसांना एका ठिकाणी घेऊन गेली आणि सायकलची चैन ठिक करण्यासाठी थांबली असताना काही मुलांनी छेडल्याचं तिने सांगितलं.

सीसीटीव्हीतून खुलासा –

मुलीने सांगितल्यानुसार, पोलिसांनी त्या परिसरातील दुकानदारांकडे विचारपूस केली. पण, असं काहीही घडलं नसल्याचं दुकानदारांनी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले, त्यात संबंधित मुलगी त्या रस्त्यावरुन जाताना दिसली. पण, तिने सांगितल्याप्रमाणे काहीच घटना घडलं नसल्याचं सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी मुलीला विश्वासात घेतलं आणि सत्य घटना सांगण्यास सांगितलं. पोलिसांनी थोडी कठोर भूमिका घेतल्यानंतर त्या मुलीने पोलिसांसमोर आपण खोटी कथा रचल्याचं कबूल केलं. ‘मुलांना मी खूप आवडते’ हे दाखवण्यासाठी त्या मुलीने छेडछाडीचा बनाव रचल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर, ‘कोणीच बॉयफ्रेंड नाहीये, त्यामुळे मैत्रिणी चिडवतात’, असंही तिने पोलिसांना सांगितलं.

आणखी वाचा (USB Condom ची मागणी का सातत्याने वाढतेय?)

आणखी वाचा – ( Viral Video : गाढव बांधून MG Hector ची धिंड ; कार मालकाविरोधात होणार कारवाई)

आणखी वाचा – (Porn वेबसाइट्स ‘बॅन’, पण पाहणाऱ्यांनी शोधला ‘जुगाड’)

आणखी वाचा – (मांजर मेली, ‘नासा’ने वाहिली श्रद्धांजली; इंटरनेटवर अश्रूंचा पूर)