21 November 2019

News Flash

शुभमन गिलच्या फोटोवर सारा तेंडुलकरची कमेंट, हार्दिकने घेतली शुभमनची फिरकी

शुभमनचा नवीन कारसोबतचा फोटो

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा त्याच्या मस्तमौला स्वभावासाठी ओळखला जातो. सध्या विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये असलेल्या हार्दिक पांड्याने टीम इंडियाचा युवा खेळाडू शुभमन गिलला इनस्टाग्रामवर चांगलच ट्रोल केलंय.

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणाऱ्या शुभमन गिलने नव्याकोऱ्या गाडीसह इनस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला. त्याच्या या फोटोवर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरनेही, अभिनंदन अशी कमेंट केली. सारा तेंडुलकरने केलेल्या या कमेंटवर, हार्दिक पांड्याने लगेचच शुभमन गिलची फिरकी घेतली.

विश्वचषकात टीम इंडियाचा पुढचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.

First Published on June 15, 2019 4:14 pm

Web Title: hardik pandya teases shubman gill after he thanks sara tendulkar psd 91
Just Now!
X