आपला आदर्श असणाऱ्या किंवा आवडत्या व्यक्तीचं नाव गोंदवून घेतल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण अनेकदा काहीजण यापेक्षाही पुढे जातात. अशाच पद्धतीने एका भारतीय चाहत्याने चक्क मिया खलिफाचा चेहराच टॅटू म्हणून काढून घेतला आहे. या चाहत्याने पायावर मिया खलिफाचा चेहरा गोंदवून घेतला असून हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की, खुद्द मिया खलिफानेही याची दखल घेतली आहे.

टॅटू आर्टिस्टने आपल्या इन्स्टाग्रामला हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सुरुवातीला टॅब्लेटच्या स्क्रीनवर मिया खलिफाचा फोटो दिसत असून नंतर पायावर टॅटू म्हणून काढण्यात आलेल्या चेहरा दिसत आहे.

Double MA and PhD Lady Selling tea on road
MA, Ph.D ची डिग्री असूनही विकतेय रस्त्यावर चहा, महिलेनी सांगितले कारण, VIDEO Viral
a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
Shocking video 9 year old girl going to school was attacked by a pitbull dog
VIDEO: भयंकर! चिमुकला अंगणात खेळत होता; इतक्यात पिटबुल कुत्रा आला अन्..आधी हल्ला, मग ओढून नेलं

मिया खलिफानेदेखील या व्हिडीओची दखल घेतली असून आपल्या इन्स्टा रिलमध्ये शेअर केलं आहे. पण यावेळी तिने दिलेली प्रतिक्रिया कदाचित चाहत्याला अपेक्षित होती तशी नसावी. हे भयानक असल्याचं म्हणत मिया खलिफाने सोबत इमोजी शेअर केली आहे.

मात्र मिया खलिफाच्या या प्रतिक्रियेचा तिच्या चाहत्यावर काही परिणाम झालेला नाही. त्याने अजून एक पोस्ट शेअर करत व्हिडीओला मिळालेल्या लाखो व्ह्यूजसाठी आभार मानले आहेत.

मिया खलिफाच्या चाहत्याने अशा पद्धतीने टॅटू काढण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी २०१८ मध्ये एका चाहत्याने असा टॅटू काढला होता, ज्यानंतर मिया खलिफाने हे थांबवा अशी विनंती करत हे योग्य नसून भीतीदायक असल्याचं म्हटलं होतं.