18 February 2019

News Flash

तब्बल ६६ वर्षानंतर त्यांनी कापली नखे

ही नखे येथील संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे ती अमर राहतील.

श्रीधर चिल्लई

भारतात कधी कोण काय करेल सांगता येत नाही. आता हेच बघा ना ८२ वर्षे वय असणाऱ्या एका व्यक्तीने आपली नखे तब्बल ६६ वर्ष वाढवली आहेत. ही नखे या व्यक्तीच्या उंचीहून जास्त वाढलेली दिसतात. त्याची नखे जगात सर्वात मोठी असल्याची नोंद झाली आहे. पुण्यात राहणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे श्रीधर चिल्लई. या अनोख्या गोष्टीमुळे २०१६ मध्ये एकाच हातावर सर्वात मोठी नखे असल्याने त्यांची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. चिल्लई यांनी १९५२ पासून आपल्या डाव्या हाताच्या बोटांची नखे कापलेली नाहीत. त्यामुळे ती किती वाढली असतील याची तुम्ही कल्पना करु शकता. आता ८२ व्या वर्षी ते आपली नखे कापण्यास तयार झाले आहेत.

ही नखे वाढल्याने ती अतिशय कडक होऊन काहीशी पिवळीही झाल्याचे आपल्याला त्यांच्या फोटोमध्ये दिसते. तसेच या नखांचा खालच्या बाजूला गुंतोळा झाल्याचेही दिसते. याहूनही आश्चर्याची गोष्ट पुढे आहे. न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअर येथे त्यांची नखे कापण्याचा सोहळा पार परडणार आहे. या सोहळ्याचे चित्रीकरणही करण्यात येणार आहे. त्यानंतर ही नखे येथील संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे ती अमर राहतील. या पाचही बोटांच्या नखांची एकूण लांबी ९०९ सेंटीमीटर असल्याचा अंदाज आहे. तर या नखांमध्ये सर्वात मोठे नख हे अंगठ्याचे असून त्याची लांबी १९७.८ सेटीमीटर आहे.

First Published on July 11, 2018 6:20 pm

Web Title: indian man shridhar chillai will finally cut his fingernails after 66 years guinness world record