रस्त्यावर कित्येक किलोमीटर दूरपर्यंत पसरलेल्या लिक्वेड चॉकलेटमुळे पोलंडमध्ये रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. या विचित्र अपघाताची काही दृश्ये सध्या सोशल मीडियामार्फत समोर आली आहे. १२ टन लिक्वेड चॉकलेट वाहून नेणार टँक ट्रक रस्त्याच्या मध्ये असणाऱ्या बॅरिकेडला धडकला.

या अपघातात टँकमध्ये मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलं चॉकलेट रस्त्यावर पसरलं. रस्त्याच्या दुतर्फा चॉकलेटची अक्षरश: नदी वाहू लागली. कित्येक किलोमीटर पर्यंत हे चॉकलेट पसरत गेलं. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. सुदैवानं यात कोणतीही जिवीतहानी झाली नसली तर चालक मात्र जखमी झाला आहे. रस्त्यावर चॉकलेट सांडलं असतानाही काही चालकांनी त्यातूनच गाड्या चालवत नेल्या त्यामुळे आणखी दूरपर्यंत ते पसरत गेल्याची माहिती फायर ब्रीजच्या अधिकाऱ्यांनी दिली.

वाचा : समुद्रातील प्लास्टीकच्या कचऱ्यापासून अदिदासने कमावले कोट्यवधी रुपये

लिक्वेड चॉकलेट सांडल्यानंतर ते काही वेगळानं घट्ट आणि कडक व्हायला सुरूवात झाली. एकवेळ रस्त्यावरचा बर्फ हटवणं सोपं आहे पण घट्ट झालेलं चॉकलेट साफ करण्यात खूप शक्ती वाया जाते अशी माहिती एका कर्मचाऱ्यांनी दिली. अखेर गरम पाणी वापरून हे चॉकलेट वितळून ते साफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे वेळखाऊ काम असलं तरी रस्ता पूर्वीसारखा स्वच्छा होईल अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे.

वाचा : प्रवाशांना फुकट प्रवास!… जेव्हा जपानी बस चालक संप पुकारतात