04 March 2021

News Flash

पाकिस्तानमध्ये सापडला जसप्रीत बुमराहचा ‘जुळा भाऊ’!

शेम टु शेम!

'ग्रीन टीम पाकिस्तान' या फेसबुक पेजवर त्याचा फोटो शेअर करण्यात आला आहे.

तुम्ही आतापर्यंत सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंग, वीरेंद्र सेहवाग यांच्यासारख्या सेम टु सेम दिसणाऱ्या व्यक्ती पाहिल्या असतील. आता आणखी एका भारतीय क्रिकेटरशी मिळत्याजुळत्या व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे. पाकिस्तानमधल्या स्टेडिअममध्ये सामना पाहायला आलेल्या चाहत्याचा चेहरा हा जसप्रीत बुमराहच्या चेहऱ्याशी अगदी मिळता जुळता असल्याचे काहींच्या लक्षात आले.

वाचा : उत्तर कोरियातील नागरिकांची हेअरस्टाईल कशी असावी हे हुकूमशहाच ठरवतो

मग काय त्याच्या नकळत त्याचा फोटो दोन्ही देशात तुफान व्हायरल झाला. ‘ग्रीन टीम पाकिस्तान’ या फेसबुक पेजवर त्याचा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा तरूण हुबेहूब जसप्रीतसारखा दिसत असल्याने काहीजण पुरते गोंधळले होते. ‘जसप्रीत बुमराह तू पाकिस्तानमध्ये XI सिरिज पाहण्यासाठी आला याबद्दल धन्यवाद. तू नेहमीच पाकिस्तानमधल्या चांगल्या कामाला पाठिंबा देत आला आहेस’ अशी ओळ त्यावर लिहिण्यात आली होती. त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला तर नवल वाटायला नको.
तब्बल ८ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले. तेव्हा हे सामने पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची मोठी गर्दी स्टेडियमध्ये जमली होती.

वाचा : यंत्रमानवामुळे माणसं बेरोजगार होतील?; पाहा आनंद महिंद्रांनी काय उत्तर दिलं

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 6:50 pm

Web Title: jasprit bumrah looklike spotted in lahore
Next Stories
1 राहुल गांधींसोबत ‘ती’ आहे तरी कोण?
2 … या देशात धावते जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन!
3 … आणि त्या झाल्या केरळच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक
Just Now!
X