उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उन याने आता नवा फर्मान काढला आहे. संपूर्ण जग नाताळ साजरा करत असताना मात्र किमने येथील नागरिकांना आपल्या आजीचा वाढदिवस साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. किम जाँग उनच्या आजीचा वाढदिवस २५ डिसेंबरला असतो. त्यामुळे या दिवशी येशू ख्रिस्ताऐवजी माझ्या आजीचा वाढदिवस साजरा करावा असा फर्मान त्याने काढला आहे.

वाचा : फक्त सुंदर तरुणींना नोकरी देणार, उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचे नवे धोरण

जेव्हा संपूर्ण जग २५ डिसेंबर हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा करत होता. तेव्हा उत्तर कोरियाच्या जनतेवर किम जाँग उन याने मात्र आपल्या आजीचा वाढदिवस साजरा करण्याची सक्ती केली. अनेक इंग्रजी वृत्तपत्राने यासंबधीची माहिती दिली आहे. किम यांची आजी जाँग सूक यांचा जन्म २५ डिसेंबर १९१९ मध्ये झाला. उत्तर कोरियाचा पहिला हुकूमशहा किम सुंग दुसरा यांच्या त्या पत्नी होत्या. त्याचबरोबर कम्युनिस्ट कार्यकर्त्या देखील होत्या. तेव्हा आपल्या आजीचा वाढदिवस साजरा करावा यासाठी त्यांनी सगळ्यांवर सक्ती केली आहे. किम जाँगचे असे आदेश कोरियन जनतेसाठी काही नवे नाही. आपल्या लहरीप्रमाणे तो निर्णय बदलत असतो. क्रूर हुकूमशहा म्हणून तो कुप्रसिद्ध आहे. त्याच्या वडिलांच्या निधनांच्यावेळी संपूर्ण उत्तर कोरियाच्या नागरिकांनी शोक करावा असा आदेश त्याने काढला होता. त्याच्या पित्याच्या अंत्ययात्रेला जो रडणार नाही त्याला शिक्षा देण्यात येईल असे त्याने फर्मान काढल्याच्या कथा तेव्हा खूप गाजल्या होत्या. तर यंदा झालेल्या ऑलिम्पिकमध्ये मेडेल जिंकू न शकणा-या खेळाडूंना तो खाणीत सक्त मजूरी करण्याची शिक्षा देणार आहे अशीही चर्चा होती.

PHOTOS 2016 : सोशल मीडियावर या विवाह सोहळ्यांची चर्चा अधिक