जंगल सफारीमधील थरारक व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळते. सफारीदरम्यान सिंहाचा हल्ला, रस्त्याच्या बाजूला असलेल्या वाघाला पाहून कार चालवणाऱ्या महिलेनं गाडी थांबवली यासारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप प्रतिसाद मिळाला आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये काही लोक कारमध्ये बसून जंगल सफारी करत आहेत, त्यावेळी रस्त्याच्या बाजूला बसलेल्या सिंहांना पाहून ते गाडी थांबवतात. सर्वजण शांतपणे सिंहांना पाहत असतात. त्याचवेळी अचानक एक सिंहिण कारजवळ येते आणि गाडीच्या आतमध्ये पाहू लागते. त्यावेळी चालकाने कार थोडी पुढे घेतली. कार आपल्यापासून दूर जातेय हे पाहून सिंहणीने आपल्या तोंडाने गाडीचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर सिंहणीला पाहून सर्वजण घाबरून गेले. या प्रतिकूल परिस्थिती घटनेचे गांभिर्य ओळखून चालकाने कार वेगाने पळवली अन् सर्वांचा जीव वाचवला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

इंडियन फॉरेस्ट सर्विसचे आधिकारी सुशांत नंदा यांनी २० मे रोजी हा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. ट्विट करताना सुशांत नंदा लिहतात की, ‘सिंहणीला सफारी राइडवर जायचेय. दरवाजा उघडून लिफ्ट मागत आहे. तुमच्या सफारवेळीही सिंहीण लिफ्ट मागू शकते. जंगली जनावरांपासून योग्य अंतर ठेवा.’

पाहा व्हिडिओ –

या व्हिडिओला सोशल मीडियावर तूफान प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. सोशल मीडियावर पक्षी-प्राणी आणि जनावरांचे (वाइल्डलाइफ) एकापेक्षा एक सरस आणि मजेदार व्हिडिओ व्हायरल होतात. प्रत्येकाला प्राण्यांच्या लढाईचे व्हिडिओ पाहायला आवडतात. नेटकरी आशा व्हिडिओला जास्त पसंती दर्शवतात.