एखादी अत्यंत महत्वाची गोष्ट हरवली की आपण अस्वस्थ होतो. त्या वस्तूची आकाश पाताळ एक करून शोधाशोध करतो. परंतु त्या नंतरही ती वस्तू सापडली नाही की आपण नाराज होतो. मात्र तिच वस्तू पुढे कित्येक वर्षानंतर आपल्या नजरे समोर आली तर आपली प्रतिक्रीया काय असेल? नक्कीच आपल्या आनंदाला पारावार उरणार नाही. असाच एक किस्सा अमेरिकेतील एका जुन्या नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीदरम्यान घडला आहे. हे नाट्यगृह १५० वर्ष जुने असून त्याचे नाव ‘द टॅलेंट फॅक्टरी’ असे आहे. द टॅलेंट फॅक्टरीच्या मालकांना पुर्नबांधणीचे काम सुरू असताना एक ७५ वर्ष जुने पाकिट सापडले.

Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
Sonam Wangchuk
लेख: लडाखवासींची लोककेंद्री विकासासाठी हाक
mumbai 8 year old girl rape marathi news
मुंबई : आठ वर्षांच्या मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार, आरोपी शिपायाला अटक

द टॅलेंट फॅक्टरीच्या मालकांनी त्या पाकीटाचा मालक कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी ते पाकिट उघडले. त्यावेळी त्यांना आत १९४४ चे कॅलेंडर सापडले त्यावरून हे पाकिट ७५ वर्ष जुने असावे असा कयास त्यांनी लावला. दरम्यान त्यांना आत कागदाच्या कपट्यावरील एक फोन नंबर देखील दिसला. परंतु नंबर ८० वर्ष जुना असल्यामुळे बंद करण्यात आला होता. शेवटी अनेक ठिकाणी संपर्क साधल्यानंतर नाट्यगृहाच्या मालकाला त्या पाकिटाच्या खऱ्या मालकाचा मोबाईल नंबर सापडला. त्या नंबरवरून त्यांनी फोन केला आणि समोरून clare mclntosh नामक एका ९० वर्षांच्या आजोबांनी फोन उचलाला. हे पाकिट त्या आजोबांचेच होते.

७५ वर्षांपूर्वी शाळेत जात असताना ‘द टॅलेंट फॅक्टरी’ नाट्यगृहाच्या परिसरात त्यांचे पाकिट हरवले होते. या पाकिटात काही पैसे, बसचा पास, शाळेचे ओळखपत्र व आई वडिलांचे फोटो होते. हे पाकिट त्यांनी १९४४ साली एका जत्रेत वडिलांकडे हट्ट करून विकत घेतले होते. त्यामुळे पाकिट हरवल्यानंतर त्यांच्या वडिलांचा जबर मार त्यांना खावा लागला होता. ही आठवण त्यांनी सांगितली. हरवलेले पाकिट हाती आल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. कारण या पाकिटाशी भावनिक नाते त्यांचे जोडले गेले होते.