27 September 2020

News Flash

Viral Video : सुंदर तरुणीकडे रोखून बघणं त्याला पडलं महागात

आयुष्यात कधी मुलींकडे पाहणार नाही!

तिला बघण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खांबाला जोरात आदळून तो खाली कोसळला

रस्त्यात एखादी सुंदर तरूणी दिसली की तिच्याकडे रोखून पाहण्याची अनेक पुरुषांची वाईट सवय असते. पण हिच सवय अनेकादा तुम्हाला अडचणीतही आणू शकते. अनेक देशांत महिलांकडे रोखून बघणे हे कायद्याने गुन्हा आहे, आणि यासाठी तुम्हाला शिक्षाही होऊ शकते. पण काही जण असे आहेत ज्यांना महिलांची खोड काढून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेण्याची सवय असते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या एका तरुणाला समोरुन येताना सुंदर तरूणी दिसली. तिला पाहून तो तिच्याकडे बघतच बसला. तिच्याकडे बघणं इथेच थांबलं नाही तर ती रस्ता ओलांडेपर्यंत तो तिच्याकडे रोखून बघत पुढे पुढे चालत होता. पण तिला बघण्याच्या नादात आपणही रस्त्यावर चालत आहोत हे मात्र तो पुरता विसरला.

तिला बघण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खांबाला जोरात आदळून तो खाली कोसळला. हा फटका एवढ्या जोरात होता की ती त्याच्या नाकाला तर मार लागलाच. पण त्याने दुकानातून जे काही सामान आणलं होतं तेही रस्त्यात सांडलं. तेव्हा त्याला अशी अद्दल घडली की आयुष्यात तो पुन्हा कधीच मुलींकडे बघण्याची हिंम्मत करणार नाही हे नक्की!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2017 10:32 am

Web Title: man checking out woman and hit to the pole
Next Stories
1 Viral Video : मेलेलं पिल्लू कवटाळून ती आई कित्येक दिवस रडत होती
2 मराठमोळ्या ‘सोनू’च्या गाण्याचं पाकिस्तानी व्हर्जन ऐकलंत का ?
3 Viral Video : सावत्र असली तरी आई ही आईच असते!
Just Now!
X