News Flash

२ मांजरींसाठी तो देतो १ लाख रुपये घरभाडे

या घरात अॅपलच्या टीव्हीबरोबरच इतरही सर्व फर्निचर बनवण्यात आले आहे

पाळीव प्राण्यांवर प्रेम करणारे आपण अनेक जण पाहतो. आता हे प्रेम करणारे किती प्रेम करतात हे कोणालाच सांगता येणार नाही. पण आपल्या या लाडक्या प्राण्यांसाठी कोणी वेगळे घर घेतलेले तुम्ही ऐकलेय? असे प्रत्यक्षात घडले आहे, एका व्यक्तीने आपल्या दोन मांजरींसाठी चक्क वेगळे भाड्याचे घर घेतले आहे. आता या घरासाठी तो किती भाडे भरतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर या भाड्यासाठी तो चक्क १ लाख रुपयांहूनही जास्त पैसे भरतो आहे. हा व्यक्ती कॅलिफोर्नियाचा असून त्याचे नाव सॅन जोस असे आहे. या दोन मांजरींची नावे टीना आणि लुईस अशी आहेत. अशाप्रकारे आपल्या मालकाकडून भेट म्हणून मिळालेल्या या घरात या दोन्ही मांजरी अतिशय ऐशोआरामात राहत आहेत.

अशाप्रकारे सुविधा मिळणाऱ्या या मांजरी विशेष भाडेकरु मांजरी असतील असे बोलले जात आहे. याबाबत या घराचा मालक म्हणतो, या मांजरींच्या सगळ्या गोष्टी त्यांचा मालक सांभाळतो आणि मला वेळेवर भाडे मिळते. विशेष म्हणजे या घरात अॅपलच्या टीव्हीबरोबरच इतरही सर्व फर्निचर बनवण्यात आले आहे. या मांजरींच्या मालकाचे वय ४३ वर्षे असून त्याचे नाव ट्रॉय गुड असे आहे. त्याने या मांजरींच्या सर्व अॅक्टीव्हीटीजची नोंद ठेवण्यासाठी एक खास इन्स्टाग्राम अकाऊंट काढले आहे. सोशल मीडियावर या घराविषयी जोरदार चर्चा सुरु आहेत. अशाप्रकारे १ लाख रुपये भाडे भरुन आपल्या मांजरींच्या राहण्याची सोय करणाऱ्या या मालकाचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. काहींनी या मालकाला अशाप्रकारे पैसे घालवण्याबद्दल वेड्यातही काढले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2019 3:58 pm

Web Title: man rents rs 1 lakh per month home for his two cats
Next Stories
1 गेल्या ३० वर्षांपासून फक्त चहावर जगतेय ही महिला
2 ‘टोटल धमाल’मधील ही माकडीण घेते आघाडीच्या अभिनेत्रींइतकेच मानधन
3 लग्नपत्रिकेत घरच्यांच्या नावाऐवजी छापले राफेल खरेदीचे स्पष्टीकरण, पत्रिका झाली व्हायरल
Just Now!
X