सोशल मिडियावर जंगली प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातही मगर, सरपटणारे प्राणी किंवा अत्यंत वेगवान प्राण्यांनी केलेली शिकार यासारख्या व्हिडिओला तर हजारोच्या संख्येने व्ह्यूज असतात. मात्र सध्या सोशल मिडियावर एक आगळावेगळाच व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चक्क मगरीला कडेवर घेऊन फिरताना दिसत आहे. यासंदर्भातील वृत्त फ्लोरिडा टुडेने दिलं आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार फ्लोरिडामधील कोको येथील समुद्र किनारी हा सर्व प्रकार घडला. मगरीला कडेवर घेऊन आइस्क्रीम पार्लरमध्ये जाणाऱ्या व्यक्तीचे नाव लूई मोरेहेड असं आहे. हा व्हिडिओ रेचन बोमन नावाच्या टिकटॉक युझरने शेअर केला आहे. या व्हिडिओमधील मगर ही सहा वर्षांची असल्याचे सांगितले जात आहे. अनेकांनी या व्यक्तीच्या कृतीचे सर्मथन केलं आहे.

गाडीमध्ये बसून एका व्यक्तीने शूट केलेल्या व्हिडिओमध्ये लूई आइस्क्रीम पार्लरच्या बाहेरील फुटपाथवरील मगरीला एखाद्या लहान बाळाप्रमाणे आपल्या कडेवर उचलून घेताना दिसतो. अनेकांनी लूईचे कौतुक करताना माणूस आणि प्राण्यांमधील नातं यामधून दिसून येत असल्याचं म्हटलं आहे. ही मगर लूईच्या मालकीची असल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे. एका संकटामधून या मगरीची सुटका केल्यानंतर लूईने तिला दत्तक घेतलं आहे. या मगरीचे नाव स्वीटी असं आहे. “स्वीटीला अंधुक दिसण्याचा त्रास आहे. त्यामुळे ती जंगलामध्ये जास्त दिवस जगू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर मी तिला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला,” असं लूईने सांगितंल.

@rachel_bowmanWhy does this sum up Florida so well? ##florida ##justfloridathings ##alligator ##gator ##gatorman ##floridamanoriginal sound – rachel_bowman

टीकटॉकवर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून ५० हजारहून अधिक  जणांनी तो शेअर केला आहे. तर साडेसहा लाखांहून अधिक जणांनी तो लाइक केला आहे.