News Flash

Video: गिटारीस्ट नाही हे आहेत एका राज्याचे मुख्यमंत्री

संगमा यांचा हा अंदाज अनेकांना भावला आहे.

मेघालयचे (Meghalya) मुख्यमंत्री (Chief Minister) कोनराड संगमा (Conrad Sangma) यांचा इलेक्ट्रिक गिटार वाजवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ स्वत: मुख्यमंत्री संगमा यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहलेय की, ‘तीन दिवसाच्या विधानसभा कामकाजानंतर अन् खूप दिवसानंतर गिटार वाजवण्याचा प्रयत्न करत आहे. काही चुका होऊ शकतात.’

ज्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्यावेळी तुम्हाला समजेल की मुख्यमंत्री संगमा एक चांगले गिटार वादक आहेत. संगमा यांचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. मुख्यमंत्र्यांना गिटार वाजवताना पाहून नेटकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका व्यक्तीने संगमा यांचं कौतुक करताना कमेंटमध्ये लिहलेय की, ‘हे खरंच कौतुकास्पद आहे.’ अन्य दुसऱ्या एका युझर्सने लिहलेय की, खूपच मस्त. अन्य एकाने लिहलेय की, सीएमला या रूपात पाहून चांगले वाटले.

 

Instagram वर ही पोस्ट पहा

 

After a hectic 3 day Assembly session .. unwinding with some iron maiden stuff .. it’s been a long while I haven’t played so I guess a few mistakes …

रोजी Conrad Sangma (@conrad_k_sangma) ने सामायिक केलेली पोस्ट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 7:19 am

Web Title: meghalaya chief minister playing the electric guitar video gone viral nck 90
Next Stories
1 …इन्सान बनेगा ! ईद साजरी करण्यासाठी शीख तरुणांकडून जामा मशिदीची स्वच्छता
2 अजब प्रेमाची गजब गोष्ट : ती जेवण मागायला आली अन् अन्नदाता तिच्याच प्रेमात पडला…
3 ‘Gupta & Son’ नाही ‘Gupta & Daughters’… परंपरा मोडीत काढणाऱ्या मेडिकलवाल्यावर कौतुकाचा वर्षाव
Just Now!
X