27 February 2021

News Flash

पैशांचा पाऊस… ट्रकमधून उडाल्या एक कोटींहून अधिकच्या नोटा

अमेरिकेतील अॅटलॅन्टामधील कंटेरनमध्ये भरलेल्या नोटा उडून ट्रकबाहेर पडू लागल्या

पैशाचा पाऊस हा शब्दप्रयोग तुम्ही याआधी नक्कीच ऐकला असेल. पण तुम्ही कधी हा पैशाचा पाऊस पाहिलाय का? अर्थात याचे उत्तर नाही असेच असणार पण असा पैशाचा पाऊस अमेरिकेतील अॅटलॅन्टामधील नागरिकांना पहायला मिळाला. एकाद्या सिनेमातील दृष्य शोभावे अशाप्रकारे चलनी नोटा वाहून नेणाऱ्या ट्रकमधून पैशाचा पाऊस पडत होता.

मंगळवारी अॅटलॅन्टामध्ये हा विचित्र प्रकार स्थानिकांना पहायला मिळाला. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास अॅटलॅन्टामधील राष्ट्रीय महामार्ग २८५ वरुन पैशाने भरलेला ट्रक जात होता. अचानक या ट्रकचे दरवाजे उघडले. त्यामुळे मागील कंटेरनमध्ये भरलेल्या नोटा उडून ट्रकबाहेर पडून लागल्या. एकूण एक लाख १७ हजार डॉलर (म्हणजेच १ कोटी १९ लाख ६३ हजारहून अधिक रुपये) किंमतीच्या चलनी नोटा पाहता पाहता काही किलोमीटरच्या अंतराआधीच रस्त्यावर पसरल्या. स्थानिक पोलिसांनी ट्विट करुन या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
डनवूडी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना ९११ ह्या आपातकालीन क्रमांकावर फोन आला. त्यावेळी फोन करणाऱ्या कार चालकाने घडलेला सर्व प्रकार सांगितला. ‘मी गाडी चालवताना अचानक बाजूने जाणाऱ्या ट्रकच्या मागील कंटेनरचे दार उघडले आणि त्यातून चलनी नोटा बाहेर पडू लागल्या.’ पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले त्यावेळी अगदी मोजक्याच नोटा रस्त्यावर पडलेल्या त्यांना आढळल्या. रस्त्यावरुन जाणाऱ्या चलकांनी या नोटा पोलीस येईपर्यंत लंपास केल्या.

या सर्व घटनेची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. ट्विटरवर या सर्व घटनेवर अनेक मीम्स आणि विनोदांचा पाऊस पडला आहे. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी या रस्त्यावरुन जाताना ज्यांनी ज्यांनी नोटा उचलल्या आहेत त्यांना त्या नोटा परत करण्याचे आवाहन केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2019 3:57 pm

Web Title: money carrying truck spills rs 1 crore in atlanta abn 97
Next Stories
1 VIDEO: विमानतळावर बॅगचे वजन करण्यासाठी त्याने चक्क १५ शर्ट घातले
2 भारताचा डाव गडगडल्याने पाकिस्तानला आनंदाच्या उकळ्या, पाहा व्हायरल मिम्स
3 वडिलांच्या कॅन्सरवरील उपचारासाठी १३ वर्षांचा मुलगा व्हिडिओ गेम खेळून जमवतोय पैसे
Just Now!
X