17 July 2019

News Flash

‘हेअर डाय लावला आणि माझा चेहरा झाला बल्बसारखा’

केमिकलचे अंश सापडल्याने या मुलीला रिअॅक्शन आल्याचे समजते आहे

हेअर डाय लावल्याने कोणच्या चेहऱ्याचा आकार बदलल्याची बातमी तुम्ही ऐकली आहे का? नक्कीच नाही. मात्र हेअर डाय लावल्याची शिक्षाच एका मुलीला झाली आहे. तिच्या चेहऱ्याचा आकारच बदलला आणि तो बल्बसारखा झाला. १९ वर्षांच्या एका फ्रेंच मुलीने हेअर डाय लावला त्यानंतर तिला या हेअर डायची रिअॅक्शन आली. ज्यामुळे तिचा गोल चेहरा चक्क बल्बसारखा दिसू लागला. तिने लावलेल्या हेअर डायमध्ये जे केमिकल होते त्याचा परिणाम तिच्या चेहऱ्याच्या आकारावर झाला.

इस्टेल असे या मुलीचे नाव आहे. ती १९ वर्षांची आहे तिने हेअर डाय अत्यंत थोड्या प्रमाणात लावला होता. मात्र त्यानंतर अचानक तिचा चेहरा सुजू लागला आणि दुसऱ्या दिशी एखाद्या बल्बसारखा दिसू लागला. ५५.८ सेटिंमीटर चेहरा सुजून ६३ सेंटिमीटरचा झाला असेही या मुलीने सांगितले.

या मुलीने तातडीने हॉस्पिटल गाठले. या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र तिने लावलेल्या हेअरडायमध्ये PPD केमिकलचे अंश सापडले. हे केमिकल केस, डोळे सुजायला सुरुवात झाली. तिच्या डोक्याला सातत्याने सूज येत होती. तिची जीभही सुजली. तसेच तिला आणखीही त्रास जाणवू लागला. PPD केमिकलमुळे हे सगळे त्रास तिला जाणवू लागल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. आता या मुलीवर उपचार करण्यात येत आहेत.

First Published on December 3, 2018 6:25 pm

Web Title: my head turned into light bulb woman after reaction to hair dye