प्राणी आणि पक्षांचे जग अद्भूत आहे. अनेकदा प्राणी पक्षांच्या जगामधील अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या गोष्टींबद्दल चर्चा होताना सोशल नेटवर्किंगवर दिसून येते. सध्या सोशल नेटवर्किंगवर अशीच एक चर्चा सुरु आहे ही म्हणजे एका गरुडाची. ही चर्चा होण्यामागील कारण म्हणजे गरुडाच्या डोळ्याची उघडझाप कशी होते. अर्थात याबद्दलचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये गरुडाच्या डोळ्यांची कदाचित याआधी कधीही न पहिलेली हलचाल टीपण्यात यश आलं आहे.

युट्यूबवरील ‘द स्लो मो गाइज’ (The Slow Mo Guys) या लोकप्रिय चॅनेलचे सर्वेसर्वा गॅव्हिन फ्री आणि डॅनियल ग्रची या दोघांनी गरुडाच्या डोळ्यांची हलचाल टीपणारा एक स्लो मोशन व्हिडिओ शूट केला आहे. लाखो फॉलोअर्स असणाऱ्या द स्लो मो गाइजच्या युट्यूबवर चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये गरुड डोळ्यांची उघडझाप करताना पूर्ण डोळे बंद न करता डोळ्याच्या आतील एक त्वचेच्या एका पातळ पडद्याचा वापर करताना दिसतो. हा त्वचेचा पांढरा पडदा अगदी पार्दर्शक असल्याचे व्हिडिओमधून दिसत आहे. पाठीचा कणा असणाऱ्या अनेक प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये थोड्याफार फरकाने अशा पद्धतीचा पदर्शक पडदा अढळून येतो. डोळ्याच्या आतील भागामध्ये हा पडदा असतो. अगदी पातळ असणाऱ्या आणि सामान्यपणे पांढऱ्या रंगाचा असणारा त्वचेचा हा पडदा डोळ्याची संपूर्ण बुबळं झाकण्याइतका पसरु शकतो.

इंडियन फॉरेस्ट सर्विसमधील आधिकारी प्रवीण कासवान यांनी ट्विटरवरुन गॅव्हिन फ्री आणि डॅनियल ग्रची यांनी शूट केलेल्या गोल्डन इगल प्रजातीच्या गरुडाच्या डोळ्यांची उघडझाप होणारा हा अल्ट्रा एचडी व्हिडिओ शेअर केला आहे. “गरुड अशापद्धतीने डोळ्यांची उघडझाप करते. गॅव्हिन फ्री याने हा स्लो मोशन व्हिडिओ शूट केला आहे. गरुडाच्या डोळ्यामध्ये एक बनावट पडदा असतो. हा पडदा संपूर्ण डोळा झाकू शकतो. या पडद्याच्या मदतीने गरुड त्यांच्या डोळ्यामध्ये जाणारी धूळ किंवा अन्य सुक्ष्म कण साफ करतात,” असं कासवान यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

हा व्हिडिओ खरं तर एका मोठ्या व्हिडिओमधील तुकडा आहे. ज्यामध्ये पक्षांच्या हलचाली गॅव्हिन फ्री आणि डॅनियल ग्रची या दोघांनी स्लो मोशनमध्ये टीपल्या आहेत. तुम्हीच पाहा हा व्हिडिओ

सामान्यपणे पक्षी अशापद्धतीने एका जागी बसून डोळ्यांची उघडझाप करताना मान फिरवतात. तर उडताना ते असं करत नाही. डोळ्यांची उघडझाप करताना पुसट दिसून नये म्हणून ते मान फिरवतात असं म्हटलं जातं.