20 October 2020

News Flash

महिलांची अंतर्वस्त्रं चोरण्यासाठी वृद्धाचा १०० किमी प्रवास

न्यूझीलंडमधल्या एका ६५ वर्षीय वृद्धाच्या विचित्र छंद पाहून नेटीझन्स आणि स्थानिक प्रशासन अवाक झाले आहे.

काही जणांना विशिष्ट वस्तू गोळा करण्याचा छंद असतो. त्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करण्याचीही त्यांची तयारी असते. वस्तू गोळा करणाऱ्यांमध्ये सामन्यपणे ही बाब आढळून येते. पण न्यूझीलंडमधल्या एका ६५ वर्षीय वृद्धाच्या विचित्र छंद पाहून नेटीझन्स आणि स्थानिक प्रशासन अवाक झाले आहे. या वृद्धाला महिलांची अंतर्वस्त्रं गोळा करण्याचा छंद आहे. त्यासाठी त्याने तब्बल १०० किलोमीटरचा प्रवास केला.

स्टिफन ग्राहॅम गार्डनर असे या वृद्धाचे नाव आहे. उत्तर ओटॅगोमध्ये राहणाऱ्या स्टिफनने अंतर्वस्त्रांच्या आठ जोडया चोरण्यासाठी माहीनो ते डनिडिन असा प्रवास केला. डनिडिन जिल्हा न्यायालयात स्टीफनने चोरीचा आरोप मान्य केला पण गुन्ह्याच्या उद्देशाने प्रवास केला नव्हता असे त्याने सांगितले.

मोआना पूल येथे स्पा घेण्यासाठी गार्डनर गेले होते. पण तिथे पोहत असताना अंतर्वस्त्र चोरीचा विचार त्यांच्या डोक्यात आला असे गार्डनरच्या वकिलाने कोर्टात सांगितले. गार्डनरने लोगान रोडवर गाडी पार्क केली व एका उघडया खिडकीमधून अपार्टमेंटमध्ये  प्रवेश केला. अंतर्वस्त्रांची चोरी करण्याआधी त्याने शोधाशोध केली. गार्डनर घरातून बाहेर पडत असताना दोन महिला पुढच्या दारात उभ्या होत्या.

दरवाजा उघडल्यानंतर गार्डनरने त्यातल्या एका महिलेला ढकलून दिले व तिथून पळ काढला. त्यानंतर गार्डनर एका बारमध्ये गेला. गार्डनर पुन्हा काही वस्तू गोळा करण्यासाठी म्हणून गुन्हा केला त्याठिकाणी पोहोचला  तेव्हा पोलिसांच्या श्वानाने त्याला पकडले. लहानपणी घडलेल्या काही घटनांमुळे गार्डनर असा विचित्र वागतो असे त्याच्या वकिलाने न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. कोर्टाने गार्डनरला घरफोडीच्या गुन्ह्यात ११ महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. ज्यांची अंतर्वस्त्रं चोरली त्यांना १ हजार डॉलर देण्याचेही आदेश दिले आहेत.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 2:35 pm

Web Title: new zealand old man travels 100 km to steal 8 pairs of womens lingerie dmp 82
Next Stories
1 Amazon Sale: अन् ग्राहकांनी 6,500 रुपयात खरेदी केली तब्बल 9 लाखांची कॅमेरा लेन्स
2 Video : जेव्हा अमेरिकेची टेनिसपटू स्वतःच्या लग्नात बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकते
3 ‘चांद्रयान २’च्या यशस्वी उड्डाणानंतर या कारणामुळे ‘नासा’ही ट्रोल, पाहा व्हायरल मिम्स
Just Now!
X