प्रसिद्ध कॅब सर्व्हिस ओला गेल्या दोन दिवसांपासून आपण एक नवी सेवा सुरु करत असल्याची प्रसिद्धी करत होतं. आपण लवकरच ओला रेस्टरुम सुरु करत असून ही एक मोबाइल टॉयलेट वॅन असेल ज्यामुळे तुम्हाला जिथे हवी असेल तिथे बाथरुमची सोय करण्यात येईल असं कंपनीकडून सांगण्यात येत होतं. ही अत्यंत वाईट कल्पना आहे असा जर तुम्ही विचार करत असाल तर त्याआधीच जाणून घ्या की, अशी कोणतीही सेवा सुरु कऱण्यात येत नसून हा एक एप्रिल फूल प्रँक होता.

दरम्यान भारतात एक मोठी समस्या असणाऱ्या अशा प्रकारच्या संवेदनशील विषयावरुन एप्रिल फूल केल्याने ओलाविरोधात संताप व्यक्त होत आहे. ओला गेल्या अनेक वर्षांपासून एप्रिल फूल प्रँक करत आहे. 2018 मध्ये कंपनीने ओला न्यूज नेटवर्क सुरु करत असल्याची घोषणा केली होती. तर 2017 मध्ये त्यांनी बेडरुममधून किचनमध्ये जाण्यासाठी ‘व्हील्स’ सेवा सुरु करत असल्याची घोषणा केली होती.

ट्विटरवर अनेकांनी ओला कंपनीला ट्रोल केलं आहे. नुपूर रावल या विद्यार्थिनीने भारतात या विषयावर एप्रिल फूल करणं एक क्रूर थट्टा असल्याचं म्हटलं आहे. भारतात अनेक ठिकाणी अद्यापही लोक उघड्यावर शौचाला बसत असून ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यावेळी ओला कंपनीला त्यांच्या चालकांनाही अनेकदा प्राथमिक विधीला जाण्यासाठी वेळ दिला जात नाही याकडे लक्ष वेधण्यात आलं आहे. अजून एका ट्विटर युजरने जाहिरातीत महिलांना दाखवण्यावर आक्षेप घेतला आहे.

<blockquote class=”twitter-tweet” data-lang=”en”><p lang=”en” dir=”ltr”><a href=”https://twitter.com/Olacabs?ref_src=twsrc%5Etfw”>@Olacabs</a&gt; only if you put this money into installing ACs in your cars and not spend brushing up your marketing skills for April Fool&#39;s day, I&#39;ll accept you as a trusted brand:<a href=”https://t.co/MGTWRfVecN”>https://t.co/MGTWRfVecN</a><a href=”https://twitter.com/hashtag/ola?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw”>#ola</a&gt; <a href=”https://twitter.com/hashtag/cars?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw”>#cars</a&gt; <a href=”https://twitter.com/hashtag/customer?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw”>#customer</a&gt; <a href=”https://twitter.com/hashtag/UX?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw”>#UX</a&gt; <a href=”https://twitter.com/hashtag/april?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw”>#april</a&gt; <a href=”https://twitter.com/hashtag/fool?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw”>#fool</a></p>&mdash; Sankalp Sinha (@sankalpdomore) <a href=”https://twitter.com/sankalpdomore/status/1112248614112251904?ref_src=twsrc%5Etfw”>March 31, 2019</a></blockquote>
<script async src=”https://platform.twitter.com/widgets.js&#8221; charset=”utf-8″></script>

अनेक ठिकाणी जिथे शौचालयं उपलब्ध नाही तिथे महिलांना छेडछाड होण्याची भीती असते. तसंच जिथे शौचालयं आहेत, तिथे इतर सुविधांचा मात्र अभाव दिसतो. स्वच्छता, साबण, पाणी अशा साध्या गोष्टीही तिथे उपलब्ध नसतात असं काहीजणांनी म्हटलं आहे. तर काहीजणांनी कंपनीने इतके पैसे जाहिरातीवर खर्च करण्यापेक्षा आपली सेवा सुधारण्यावर खर्च करावेत असा सल्ला दिला आहे. असे अनेक दाखले देत ओला कंपनीवर टीका करण्यात आली आहे. ओला कंपनीने मात्र आपण जनजागृती करण्याच्या दृष्टीने हा विषय निवडला असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.